JDS Politics: केंद्रात भाजपशी युती अन् महाराष्ट्रात पडली उभी फूट; 'या' पदाधिकाऱ्यांनी केला समाजवादी पक्षात प्रवेश

devigauda and modi
devigauda and modi sakal
Updated on

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचे अध्यक्ष एच. पी. देवेगौडा यांनी नुकतीच भाजपशी युती केली आहे. समाजवादी विचारसरणीचा पक्ष असल्याने भाजपसोबत युती केल्याने पालघर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.

परिणामी जिल्ह्यातील जनता दलाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला. आता सर्वच वरिष्ठ नेत्यांनी पक्षांतर प्रवेश केल्याने पक्षात फूट पडल्याने जनता दलाचे अस्तित्व जिल्ह्यात संपू लागले आहे.

devigauda and modi
JD Majethia: 'खिचडी', 'साराभाई व्हर्सेस साराभाई' मालिकेचे निर्माते - अभिनेते जे. डी. मजेठिया यांंच्या वडिलांचं निधन

पालघर तालुक्यातील जनता दलाच्या पदाधिकाऱ्यांनी समाजवादी पक्षात जायचे की, सध्या जनता दलात राहायचे, याबाबतचा निर्णय घेतलेला नसल्याचे जनता दलाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लवेकर यांनी सांगितले.

जिल्ह्यातील दिवंगत आमदार स. गो. वरटी, पंढरीनाथ चौधरी, नवनीत शहा, माजी आमदार डॉमिनिक घोन्सालवीस, ठाणे जिल्हा जनता दलाचे दिवंगत विलास विचारे, म. वी. कुलकर्णी, ठाणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिवंगत वासुदेव वर्तक, पक्षाचे माजी उपाध्यक्ष मनवेल मुस्कानो यांनी पालघरमध्ये समाजवादी विचारसरणी रुजवली. यासाठी त्यांनी अनेक आंदोलने यशस्वी केली होती, परंतु आता कार्यकर्त्यांकडून पक्षांतराला प्राधान्य दिले जात आहे.

devigauda and modi
Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार अयोध्येत 'रोड शो'; हे आहे कारण

कार्यकर्त्यांची नियुक्ती जाहीर
पालघर जिल्ह्यातील जनता दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी समाजवादी पक्षामध्ये प्रवेश केला. या कार्यकर्त्यांच्या नियुक्ती जाहीर केल्या आहेत. प्रदेश उपाध्यक्ष म्हणून मनवेल तुस्कानो, कार्यकारिणी सदस्य जितेंद्र सतपालकर, विरार-वसई शहर चिटणीस रघुनाथ कालभाटे, वसई विभाग उपाध्यक्ष दिनेश सामंत, महिला आघाडी प्रमुख प्रणिता जाधव, वसई-विरार शहर अध्यक्ष कुमार राऊत, विरार विभाग अध्यक्ष अल्ताफ हुसेन महंमद, शहर उपाध्यक्ष पायस मचाडो यांचा समावेश आहे

devigauda and modi
Narendra Modi Nashik: पंतप्रधान नरेंद्र मोदी जानेवारीत नाशिकमध्ये; पोलिस यंत्रणा सतर्क

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()