Jammu Kashmir Terror Attack : जम्मू-काश्मीरमधील हल्ल्यात अकोल्याचा जवान शहीद; गावावर शोककळा, चार दहशतवाद्यांचा खात्मा

प्रवीण प्रभाकर जंजाळ असं 24 वर्षीय शहीद झालेल्या जवानाचं नाव आहे. 2019 मध्ये प्रवीण जंजाळ हे भारतीय सैन्य दलात दाखल झाले. त्यांच्या लग्नाला नुकतंच एक वर्ष झालं आहे. त्यांच्या मृत्यूच्या पश्चात पत्नी, आई-वडील, मोठा भाऊ असा परिवार आहे.
Jammu Kashmir Terror Attack
Jammu Kashmir Terror Attackesakal
Updated on

Akola News : जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात शनिवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले आहेत. त्यानंतर सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांना ठार केले. दोन वेगवेगळ्या ठिकाणी दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी दहशतवादविरोधी कारवाई सुरू केली होती, त्यानंतर दहशतवाद्यांसोबत चकमक झाली.

शनिवारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात अकोल्यातील एक जवान शहीद झाला आहे. अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे गावातील प्रवीण जंजाळ हा तरुण जवान शहीद झाला आहे. प्रवीण जंजाळ हे शहीद झाल्याची माहिती गावात पोहोचताच गावावर शोककळा पसरली. कुटुबियांसह पत्नी आणि आईनं एकच टाहो फोडला आहे.

Jammu Kashmir Terror Attack
Girish Mahajan Audio Clip : धनगर उपोषणकर्त्यांबद्दल गिरीश महाजन काय म्हणाले? रमेश कराड यांच्यासोबतची ऑडिओ क्लिप व्हायरल...

दरम्यान, प्रवीण प्रभाकर जंजाळ असं 24 वर्षीय शहीद झालेल्या जवानाचं नाव आहे. 2019 मध्ये प्रवीण जंजाळ हे भारतीय सैन्य दलात दाखल झाले. त्यांच्या लग्नाला नुकतंच एक वर्ष झालं आहे. त्यांच्या मृत्यूच्या पश्चात पत्नी शाममाला प्रवीण जंजाळ, आईचं शालू प्रभाकर जंजाळ, वडील प्रभाकर जंजाळ, भाऊ सचिन प्रभाकर जंजाळ असा परिवार आहे.

शहीद जवानाचा मृतदेह नेमका कधी गावी येणार? याबाबत अद्याप जिल्हा प्रशासनाला कोणत्याच सुचना नाहीत. शहीद जवानावर त्यांच्या मोरगाव भाकरे या गावात शासकीय आणि लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.

चार महिन्यांपूर्वीच आले होते सुटीवर

प्रवीण जंजाळ हे चार महिन्यांपूर्वीच गावी सुटीवर आले होते. प्रवीण यांची कुटुंबासोबतची ही शेवटची भेट ठरली. प्रवीण यांचे प्राथमिक शिक्षण गावात तर बारावीपर्यंतचे शिक्षण गायगाव येथे झाले होते. त्यांच्या मित्रांनी प्रवीण यांच्या गावातील शेवटच्या भेटीतील आठवणींनी रात्र जागून काढली. विशेष म्हणजे कालच प्रवीण यांनी आपल्या वडिलांना घराच्या बांधकामसाठी 39 हजार रुपये पाठवले होते.

Jammu Kashmir Terror Attack
Basket Bridge Case : 'तुम्हाला नितीन गडकरींचा अपमान करायचा आहे का?' असं का म्हणाले धनंजय महाडिक?

प्रवीण यांचे दोन काकाही होते सैन्यदलात

दरम्यान, प्रवीण हे सैन्यदलात दाखल झालेले जंजाळ कुटुंबातील तिसरे जवान होते. त्यांच्या पूर्वी त्यांचे मोठे बाबा भास्करराव बाजीराव जंजाळ व त्यांचे काका रविंद्र जंजाळ हे सैन्यदलात होते. भास्करराव यांचे चार वर्षांपूर्वी हृदविकाराने निधन झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.