'मला पाडण्यासाठी राष्ट्रवादीने 22 नेते कोट्यवधींना विकत घेतले'

Sharad Pawar vs Jayakumar Gore
Sharad Pawar vs Jayakumar Goreesakal
Updated on
Summary

'पवारांचा आदेश आणि मिळालेले पैसे घेऊन सगळी फौज माझ्याविरोधात लढली; पण..'

बिजवडी (सातारा) : बारामती, फलटण, कऱ्हाड, साताऱ्यातून माझ्यावर राष्ट्रवादीकडून (NCP) मिसाईलचा मारा केला जातो; पण माझ्याकडे त्यांच्या सगळ्या मिसाईलला पुरून उरणारे माझ्यावर विश्वास असणाऱ्या जनतेचे हुकमी मिसाईल आहे. ‘माणच्या गोरेंनी मला माढ्यातून घालवून देशात माझी अब्रू घालवली. काहीही करून सगळे एकत्र या आणि त्यांना पाडा,’ असा आदेश पवार (Sharad Pawar) यांनी सिल्व्हर ओकवर (Silver Oak) झालेल्या बैठकीत दिला होता. मतदारसंघातील 22 नेते कोट्यवधींना विकत घेण्यात आले होते, असा थेट आरोप आमदार जयकुमार गोरे (Jayakumar Gore) यांनी राष्ट्रवादीसह शरद पवारांवर केलाय.

दिवड येथे विविध विकासकामांच्या लोकार्पण आणि तालुक्यातील भाजपच्या (BJP) नूतन पदाधिकाऱ्यांच्या सत्कार सोहळ्यानंतर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. या वेळी आमदार जयकुमार गोरे, ज्येष्ठ नेते अर्जुन काळे, जिल्हा परिषद सदस्य अरुण गोरे, सभापती विलासराव देशमुख, रंजना जगदाळे, सरपंच जाकीर सय्यद, उपसरपंच किरण सावंत आदी उपस्थित होते. जयकुमार गोरे पुढे म्हणाले, पवारांचा आदेश आणि मिळालेले पैसे घेऊन सगळी फौज माझ्याविरोधात लढली. पैशांचा पूर आणि जातीपातीचे राजकारण केले; पण जयकुमारने त्यांना हिसका दाखवला. मला पाडायची संधी हुकल्याने आता पुढील १५ वर्षे ‘त्यांनी’ आमदारकीची स्वप्नेच बघू नयेत, असा टोलाही आमदार गोरेंनी राष्ट्रवादीला लगावलाय.

Sharad Pawar vs Jayakumar Gore
MIDC पळवण्याचा कट उधळून लावू; खासदार रणजितसिंहांचा इशारा

माण तालुक्यातील औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) Maan Taluka MIDC पळवून नेण्याचा कट कोण रचत असेल त्यांनी सावध राहावे. कारण, या मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे आहेत. जोपर्यंत आमदार गोरे व मी तुमच्या पाठीशी आहे. तोपर्यंत ही एमआयडीसी कोणीही पळवून नेऊ शकत नाही. त्यामुळे माणवासियांनो निश्चित राहा. आमदार गोरेंनी आजपर्यंत अनेक राजकीय कट हाणून पाडले. एमआयडीसी पळवून नेण्याचा कटही ते हाणून पाडतील, असा विश्‍वास खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर (Ranjitsingh Naik- Nimbalkar) यांनी शेवटी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.