रणजितसिंह निंबाळकर, जयकुमार गोरे, सदाभाऊ खोत पंतप्रधानांच्या भेटीला

Jayakumar Gore Sadabhau Khot Ranjitsingh Naik-Nimbalkar met PM Narendra Modi
Jayakumar Gore Sadabhau Khot Ranjitsingh Naik-Nimbalkar met PM Narendra Modiesakal
Updated on
Summary

'विकासकामांबाबत महाविकास आघाडी सरकार उदासीन आहे.'

फलटण शहर (सातारा) : खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर (Ranjitsingh Naik-Nimbalkar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेऊन माढा लोकसभा मतदारसंघातील (Madha Lok Sabha constituency) प्रलंबित विकासकामांबाबत माहिती देऊन या कामांच्या पूर्णत्वासाठी भरीव निधीची तरतूद करण्याची मागणी केली. नीरा- देवघर प्रकल्प (Nira-Deoghar project), कृष्णा- भीमा स्थैर्यीकरण, जिहे- कटापूर योजना (Jihe-Katapur scheme), फलटण पंढरपूर लोहमार्ग आदी कामांच्या निधीबाबत पंतप्रधानांना सकारात्मक दृष्टिकोन दर्शविला आहे.

खासदार रणजितसिंह यांनी नवी दिल्ली येथे पंतप्रधानांची भेट घेतली. त्या वेळी आमदार जयकुमार गोरे (Jayakumar Gore), माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) उपस्थित होते. ब्रिटिश काळात मान्यता मिळालेला; परंतु अद्याप निधीअभावी रखडलेला फलटण ते पंढरपूर लोहमार्ग पूर्णत्वास नेण्यासाठी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi Government) उदासीन आहे. या मार्गाच्या पूर्णत्वासाठी केंद्र शासनाने निधीची तरतूद करावी, अशी अपेक्षा रणजितसिंहांनी व्यक्त केली. नीरा-देवघर प्रकल्प आणि कृष्णा भीमा स्थैर्यीकरणाचा (नदी जोड प्रकल्प) प्रश्न सुटला, तर महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त सातारा, सांगली, मराठवाडा या भागांतील पाण्याचे दुर्भिक्ष कायमचे संपेल, असे पंतप्रधानांच्या निदर्शनास आणून देत हे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी निधीची तरतूद करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Jayakumar Gore Sadabhau Khot Ranjitsingh Naik-Nimbalkar met PM Narendra Modi
शिवसेना पुरस्कृत उमेदवारानं गळ्यात बुटांचा हार घालून सुरु केला 'प्रचार'

या वेळी माढा लोकसभा मतदारसंघातील अन्य प्रकल्प, विकासकामे, नवीन योजनेबाबत पंतप्रधानांनी माहिती घेत या कामांच्या निधीबाबत सकारात्मक दृष्टिकोनातून पावले उचलली जातील, असे आश्वासन दिले. खासदार रणजितसिंह यांची नुकतीच ‘गड व किल्ले संवर्धन’ समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. या निवडीबद्दल पंतप्रधान मोदींनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.