जयंत पाटीलही अजित पवारांच्या वाटेवर? सांगलीच्या खासदाराच्या विधानाने चर्चांना उधाण

Jayant Patil and Ajit Pawar
Jayant Patil and Ajit Pawar
Updated on

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यामुळे अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मात्र आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र आता सांगलीचे भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाबाबत सूचक विधान केलं आहे.

Jayant Patil and Ajit Pawar
Divorce Case: पतीवर खोटे आरोप करणे अन् सतत पोलिसांची धमकी देणे क्रूरता; दिल्ली हायकोर्टाचे निरीक्षण

मिरजमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात संजयकाका पाटील म्हणाले की, १५ दिवसांपूर्वी जयंत पाटलांचा सुरेश बापूंनी कार्यक्रम घेतला. ते आता भाजपमध्ये येतायत की राष्ट्रवादीत जातायत की अजितदादांच्या गटात जातात? निशीकांत दादा आपल्याला होकायंत्राने इशारा दिलाय, असं सूचक विधान संजयकाकांनी केलं आहे. त्यामुळे जयंत पाटील अजित पवारांच्या मार्गाने जाणार अशी चर्चा सुरू झाली आहे.

Jayant Patil and Ajit Pawar
इतके लोक सोडून गेले, त्यावेळी काही केलं नाही, २०२४ मध्येही...; भाजपचं ठाकरेंना प्रत्युत्तर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला जयंत पाटील यांच्या अनेक समर्थकांनी हजेरी लावली होती. जयंत पाटील सध्या ईडीच्या फेऱ्यात अडकलेले आहेत. त्यामुळे ते भाजपसोबत जातील, अशी चर्चा सुरू आहे.

याआधी जयंत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना आपण शरद पवार यांच्यासोबत राहणार असल्याचं म्हटलं होतं. त्याचवेळी अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीदरम्यान जयंत पाटील देखील तिथं उपस्थित होते. वास्तविक ही कौटुबिक भेट होती, असं म्हटलं होतं. मात्र जयंत पाटील हे तर कुटुंबातील नाहीत, मग ते तिथं कसे, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.