Devendra Fadanvis : जयंत पाटलांचा फडणवीसांवर निशाणा, म्हणाले तुमचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ भ्रष्टाचाराचे....

Jayanta Patil: सरकारमधील मंत्र्याच्या वरदहस्ताने डांबराच्या बिलातून शेकडो कोटी रुपये उकळले असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
Devendra Fadanvis : जयंत पाटलांचा  फडणवीसांवर निशाणा, म्हणाले तुमचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ भ्रष्टाचाराचे....
Devendra Fadanvis jayant patil sakal
Updated on

Maharashtra Vidhansabha: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेला नागपूर मेट्रो म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी पुरवणी मागण्यांवरील चर्चेत केला. विधानसभा अधिवेशनात आज पुरवणी मागण्यांवर चर्चा झाली.

या चर्चेत सहभागी होताना पाटील यांनी नागपूर मेट्रो प्रकल्पात झालेल्या भ्रष्टाचाराबाबत सरकारवर हल्ला चढविला. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागात डांबर गैरव्यवहार झाला असून सरकारमधील मंत्र्याच्या वरदहस्ताने डांबराच्या बिलातून शेकडो कोटी रुपये उकळले असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

Devendra Fadanvis : जयंत पाटलांचा  फडणवीसांवर निशाणा, म्हणाले तुमचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ भ्रष्टाचाराचे....
Devendra Fadnavis : सौर कृषी पंपांसाठी शेतकऱ्यांवर भार नाही;देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण
Devendra Fadanvis : जयंत पाटलांचा  फडणवीसांवर निशाणा, म्हणाले तुमचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ भ्रष्टाचाराचे....
Jayanta Patil: सांगलीच्या अपक्ष उमेदवाराची मी शिफारस केलेली, मात्र... जयंत पाटलांचा मोठा खुलासा

पाटील म्हणाले, की नागपूरच्या मेट्रो प्रकल्पात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचे ‘कॅग’च्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रकल्पावर उपमुख्यमंत्री महोदयांचे ‘स्क्रॅच टू बॉटम’ लक्ष होते. तरीही हा भ्रष्टाचार कसा झाला असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने नागपूर मेट्रोबाबत भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाद्वारे निर्धारित केल्यानुसार केंद्रीय सार्वजनिक खरेदी पोर्टलवर त्यांच्या निविदा प्रकाशित केल्या नाहीत.

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने स्पर्धात्मक दर मिळविण्यासाठी निविदांची व्यापक प्रसिद्धी सुनिश्चित करण्याची संधी गमावली. त्यामुळे ठराविक लोकांनाच कंत्राट मिळवून देण्यासाठी ही व्यवस्था निर्माण केली गेली आहे का, अशी शंका जयंत पाटील यांनी सभागृहात उपस्थित केली. राज्याच्या तिजोरीला ४.७३ कोटींचा फटका बसला, असेही ते म्हणाले.

डांबर गैरव्यवहारातून शेकडो कोटी

सरकारमधील मंत्र्याच्या वरदहस्ताने डांबराच्या बिलातून शेकडो कोटी रुपये उकळले गेल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला. ते म्हणाले, की आर. डी. सामंत कन्स्ट्रक्शन कंपनीला रत्नागिरी जिल्ह्यातील शासकीय कामांची कंत्राटे दिली आहेत. सरकारमधील एका मंत्र्यांचे सगेसोयरे या कंपनीमध्ये कार्यरत आहेत. या मंत्र्यांच्या वरदहस्तामुळे या कंपनीने विविध विभागांमधील कामे घेऊन गैरव्यवहार केला आहे, असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर निशाणा साधला.

Devendra Fadanvis : जयंत पाटलांचा  फडणवीसांवर निशाणा, म्हणाले तुमचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ भ्रष्टाचाराचे....
Devendra Fadnavis : पेपर फुटीबाबतचा कायदा आणणार : फडणवीस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.