Ajit Pawar: पुन्हा जुन्या कढीला उत...अजित पवारांनी जयंत पाटलांची केली पाठराखण

आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. तत्पुर्वी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधत सत्ताधारांचा चांगलाच समाचार घेतला.
Ajit pawar
Ajit pawar Sakal
Updated on

आज अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. तत्पुर्वी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधत सत्ताधारांचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी त्यांनी जयंत पाटलांची पाठराखण करत त्यांच्यावर करण्यात आलेली कारवाई अयोग्य असल्याचे म्हटले आहे. तसेच, अनेक घडामोडींवर त्यांनी यावेळी भाष्य केलं.(Jayant Patil controversy statement Ajit Pawar Maharashtra Politics Devendra Fadnavis )

काय म्हणाले अजित पवार?

जयंत पाटील यांनी निर्लज्ज हा शब्द अध्यक्षांसाठी नव्हता. मी ३०-३२ वर्ष झालं राजकारणात आहे. अनेकवेळी असं शब्द वापरलं आहेत. पण हे सरकार सोयीचं सरकार आहे. मुंबईचे महपौर असताना छगन भुजबळ यांनी मुंबई ही सोन्याची कोंबडी आहे असं म्हटलं होत.

त्यांच्या या विधानावर भाजपने गोंधळ घातला होता. मी कागपत्राचा दाखला देणार आहे. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्ष नेते असताना मुंबईला सोन्याची कोंबडी म्हटलं होत. असे अनेकांच्या विधानाचे दाखले देत अजित पवार यांनी जयंत पाटलांची पाठराखण केली.

सत्ताधारी पक्षांनी समंजस भूमिका घेतली पाहिजे. जयंत पाटलांनी अपशब्द वापरला नाही. जयंत पाटलांवरील कारवाई अयोग्य आहे. सत्ताधारी पक्षाच वर्तन चुकीचं आहे. सोयीच राजकारण सुरू आहे. असा आरोप करत सत्ताधारांवर अजित पवारांनी निशाणा साधला.

दिशा सालियानाच्या मृत्यूच प्रकरण अधिवेशनात उकरुन काढण्याची गरज नव्हती. सत्ताधारांवर आरोप होत असताना लक्ष विचलीत करण्यासाठी नकोत्या प्रश्नांची चर्चा करण्यात येत आहे. जे हायत नाही अशा लोकांबद्दल बोलायचं. पुन्हा जुन्या कडील उत आणण्याचा प्रयत्न आहे.

एसआयटी चौकशी संदर्भात विचारलं असता. सत्ताधारी पक्षातील नेत्यांची चौकशी होत नाही. केवळ विरोधी पक्षातील लोकांची चौकशी होत असते. भूखंड प्रकरण हे भाजपने उघड केलं होतं. भाजप नेत्याकडून मुख्यमंत्री शिंदे यांच्याविरोधात याचिका कोर्टात दाखल करण्यात आली आहे. असं अजित पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले.

तसेच, अजित पवारांनी कर्नाटक महाराष्ट्र सीमावादावरही भाष्य केलं. आज अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. पण राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कचखाऊ भूमिका का घेतात हे कळायला अर्थ नाही. आम्ही मुंबईत झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत सांगतिलं होतं, आणि त्यांनीही मराठी भाषिकांना दिलासा देण्यासाठी, मदत करण्यासाठी तसा संदेश देण्याची गरज असल्याचं मान्य केलं होतं.

आपण दोन्ही सभागृहात एकमताने ठराव करु सांगितलं होतं. पण अजून आपला ठराव आलेला नाही आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री मात्र एक इंच जागा देणार नाही असा ठराव करुन मोकळे झाले,” अशी टीका अजित पवारांनी केली आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री ज्याप्रमाणे आक्रमकपणे त्यांची बाजू मांडताना दिसत आहेत तसे आपले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री का मांडत नाहीत हा प्रश्न आम्हाला पडला आहे. असही अजित पवार यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.