राज्यसभेच्या पराभवाचं खापर शिवसेनेच्या माथी, जयंत पाटील म्हणाले..

अपक्ष आमदारांच्या संपर्कात शिवसेना होती, निवडणुकीची जबाबदारीही शिवसेनेकडेच होती
latest political News
latest political News
Updated on
Summary

अपक्ष आमदारांच्या संपर्कात शिवसेना होती, निवडणुकीची जबाबदारीही शिवसेनेकडेच होती

नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत (rajya sabha election result ) शिवसेनेचा पराभव झाला. भाजपाने राजकीय खेळी खेळत धनंजय महाडिक यांना उभे केले. चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत सेनेचे (Shiv Sena) उमेदवार संजय पवार (sanjay pawar) यांचा पराभव झाला. त्यामुळे सध्या या पराभवा संदर्भात शिवसेना आत्मचिंतन करत आहे. दरम्यान, संजय पवार यांच्या पराभवाचे खापर महाविकास आघाडीतील नेते एकमेकांवर फोडत आहेत. (latest political News)

अनपेक्षितपणे राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असल्याची चर्चा आहे. शिवसेनेच्या पराभवा‌विषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) निवडणुकीतील पराभवाचे खापर शिवसेनेच्या माथी फोडले आहे.

latest political News
भाजपला रोखण्यासाठी ममता बॅनर्जी अ‍ॅक्टीव्ह मोडमध्ये, विरोधकांची बांधणार मोट

यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, अपक्ष आमदारांच्या संपर्कात शिवसेना होती. निवडणुकीची जबाबदारीही शिवसेनेकडेच होती. मंत्री जयंत पाटील शनिवारी माळशिरस तालुक्यातील गारवाड येथे पाझर तलावांची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी‌ राज्यसभा निवडणूक निकालावर ही प्रक्रिया दिली. काल दिवसभर राज्यसभा निवडणुकीतील जय-पराजयाची चर्चा सुरू असतानाच मंत्री जयंत पाटील यांनी मात्र पराभवाचे खापर शिवसेनेच्या माथी मारले आहे.

पुढे ते म्हणाले, महाविकास आघाडीसोबत असलेल्या पाच ते सहा अपक्ष आमदारांनी आम्हाला मतदान केले नाही. परंतु त्यांची आताच नावं घेणे योग्य होणार नाही, असे सांगत आमदार संजय शिंदे आणि देवेंद्र भोयर यांची त्यांनी पाठराखण केली. आम्ही सर्व जण पहिल्या पसंतीच्या मताकडे लक्ष दिले पण दुसऱ्या पसंतीच्या मतांनी आमचा घात केला. आजही पहिल्या पसंतीची १६३ मते महाविकास आघाडी सोबत असून सरकारला कोणताही धोका नाही, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

latest political News
'आमच्या हातात २ दिवस ईडी द्या, फडणवीससुद्धा शिवसेनेला मतदान करतील'

दरम्यान, या पराभवानंतर अनेक नेत्यांनी आरोपप्रत्यारोप केले आहेत. तर दुसरीकडे महाविकासा आघाडीतील नेते एकमेकांवर आरोप करताना दिसत आहेत. आता जंयत पाटील यांच्या या वक्तव्यावर शिवसेना कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.