जयंत पाटलांचा 'हा' पॅटर्न राज्यात राबविणार; उपमुख्यमंत्री अजितदादांची मोठी घोषणा, नेमका कोणता आहे पॅटर्न?

महाविकास आघाडीच्या काळात जयंत पाटील यांच्याकडे सांगलीच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी होती.
Jayant Patil Ajit Pawar
Jayant Patil Ajit Pawaresakal
Updated on
Summary

''जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सांगली जिल्ह्यात ‘माझी शाळा आदर्श शाळा’ व ‘स्मार्ट पीएचसी’ हे उपक्रम सुरू केले. हे उपक्रम अतिशय यशस्वी ठरले.''

मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळात पालकमंत्री असताना जयंत पाटील (Jayant Patil) यांनी जिल्हा परिषद शाळांचा व आरोग्य व्यवस्थांचा दर्जा वाढावा यासाठी सांगली जिल्ह्यात ‘माझी शाळा आदर्श शाळा’ व ‘स्मार्ट पीएचसी’ हे उपक्रम सुरू केले. हे उपक्रम अतिशय यशस्वी ठरले असल्याने ते संपूर्ण राज्यभर राबवणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विधानसभेत केली.

महाविकास आघाडीच्या काळात जयंत पाटील यांच्याकडे सांगलीच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी होती. त्या काळात त्यांनी जिल्हा परिषद शाळेचा शैक्षणिक व भौगोलिक दर्जा सुधारण्यासाठी तसेच जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचा दर्जा सुधारण्यासाठी उपक्रम राबविले. या उपक्रमांतर्गत शाळेत डिजिटल क्लास रूम, प्रशिक्षित शिक्षक, प्ले ग्राऊंड, चांगल्या दर्जाचे स्वच्छतागृह आदींचा समावेश केला होता. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरक औषधांचा साठा, सुसज्ज यंत्र तसेच रिक्त जागी नोकर भरती करत आरोग्य केंद्राचा दर्जा वाढवला.

Jayant Patil Ajit Pawar
Basket Bridge Case : 'तुम्हाला नितीन गडकरींचा अपमान करायचा आहे का?' असं का म्हणाले धनंजय महाडिक?

या उपक्रमास जिल्हा नियोजन समितीतून निधी देण्यात आला. तसेच शाळेसाठी ग्रामस्थ व माजी विद्यार्थी यांना एकत्रित करुन विशेष निधी उभारला. सद्यस्थितीला ५५० पेक्षा अधिक शाळांची सुधारणा प्रगतीपथावर असून ६५ प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी स्मार्ट पीएचसी उपक्रमाची सुरुवात झाली आहे. हा उपक्रमही आता राज्यात राबवला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.