Rohit Pawar vs Jayant Patil: जयंत पाटलांना बॅकफुटवर ढकलण्याचं काम की दुसरं काही? सांगली-हातकणंगलेत खरंच विरोधात काम केलं का?

Rohit Pawar vs Jayant Patil Controversy: राष्ट्रवादी एकसंघ होती तेव्हा अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यातील वाद जाहीरपणे पाहायला मिळाला. आता रोहित पवार आणि जयंत पाटील, असा वाद निर्माण झाला. या वादाची पार्श्वभूमी नेमकी काय जाणून घेऊया.
Rohit Pawar vs Jayant Patil
Rohit Pawar vs Jayant Patilesakal

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आमदार रोहित पवार यांचा नामोल्लेख टाळत दिलेला सबुरीचा सल्ला राज्यात चर्चेचा ठरला आहे. जयंत पाटील यांनी, ‘माझी मुदत किती महिने राहिली, ते मोजत बसू नका, मी नोव्हेंबरमध्ये स्वतःच ‘नमस्कार’ करणार आहे,’ असे विधान केले. त्यांच्या या विधानाला रोहित पवार यांच्या आधीच्या वक्तव्याचा संदर्भ होता. मात्र त्यावरून पक्षांतर्गत मतभेदाची चर्चा रंगली. हे पक्षांतर्गत लोकशाहीचे द्योतक असल्याचे वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगत सारवासारव केली.

पक्षाच्या रौप्यमहोत्सवानिमित्त झालेल्या कार्यक्रमात जयंत पाटील म्हणाले, ‘‘काही लोक माझ्या अध्यक्षपदासंबंधी महिने मोजत आहेत. मात्र मला केवळ चारच महिने द्या. राज्यात सरकार आणू. त्यानंतर मी स्वतःच ‘नमस्कार’ करेन. माझ्याबद्दल काही तक्रारी असतील तर तर थेट शरद पवार यांच्या कानात सांगा. त्यांनी दोन कानशिलात दिल्या तर त्या घेऊ. उगाच जाहीर वाच्यता करू नका.’’

जयंत पाटील यांच्या या विधानांचा संदर्भ रोहित पवार यांच्या आधीच्या वक्तव्यांशी होता. लोकसभा निवडणूक निकालानंतर रोहित पवार यांच्याविषयी ‘संघर्षातही न डगमगणाऱ्या युवा नेतृत्वाचा उदय’ असे जाहिरात स्वरुपातील लेख प्रसिद्ध केले होते, तर जयंत पाटील यांच्यातर्फे ‘विजयाचा सेनापती’ अशा मथळ्याच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या होत्या. एकूणच, ही विसंगती राज्यात चर्चेची ठरली असताना रोहित पवार यांनी, विजयाचा कोणी एक सेनापती नाही, हे यश शरद पवार आणि राज्यभरातील कार्यकर्त्यांचे सामूहिक असल्याचे जाहीरपणे सांगितले होते.

सारे काही आलबेल नाही -

या वादात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी केलेली टीका जयंतरावांच्या जिव्हारी लागणारी ठरली होती. ‘‘ज्या-ज्या वेळी प्रदेशाध्यक्ष बदलण्याची वेळ आली, त्या-त्या वेळी जयंत पाटील यांनी ती वेळ मारून नेली. सोमवारी वर्धापन दिनाच्या सभेत सुद्धा त्यांनी वेळ मारून नेली. विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर आपण हे पद सोडू, असे पाटील यांनी जाहीर केले आहे. असेच सुरू राहिले, तर अनेक दिवसांपासून पक्षसंघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त करणारे रोहित पवार पुढच्या वर्धापनदिनापर्यंत कंटाळून अजित पवार यांच्यासारखा निर्णय घेतील.’’ एकूणच, राष्ट्रवादीअंतर्गत सुरू असलेला हा वाद पक्षात सारे काही आलबेल नाही, हे दर्शवणारा ठरला आहे. त्याचे पडसाद काय असतील, याची चर्चा रंगली आहे.

राष्ट्रवादी एकसंघ होती तेव्हा अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यातील वाद जाहीरपणे पाहायला मिळाला. आता रोहित पवार आणि जयंत पाटील, असा वाद निर्माण झाला. या वादाची पार्श्वभूमी नेमकी काय जाणून घेऊया.

जयंत पाटील यांना काही विरोध होत असला तरी त्यांच्यावर शरद पवार यांचा मोठा विश्वास आहे. त्यामुळे ते आतापर्यंत प्रदेशाध्यक्ष पदावर आहेत. अजित पवार यांची इच्छा असताना देखील राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष बदलण्यात आला नव्हता. त्यामुळे रोहित पवार अजून नवखे आहेत, असे जेष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी सांगितले.

हेमंत देसाई म्हणाले, निवडणूक प्रचार काळात अजित पवार यांच्यावर हल्ला करण्यासाठी शरद पवार यांनी रोहित पवार यांना मुक्तता दिली होती. परंतू या निवडणुकीच्या अगोदर संपूर्ण राज्यव्यापी प्रचार यात्रा जयंत पाटील यांनी काढली होती. त्यानंतर युवक अध्यक्ष महेबूब शेख यांच्या नेतृत्वात देखील यात्रा निघाली. हे सर्व यश मिळते याला शरद पवार कारणीभूत असतातच पण त्या आधी कोणीतरी ग्राऊंडवर काम केलेलं असतं. जयंत पाटील यांनी पक्ष संघटना बांधणीचं काम त्यांनी केलं आहे.

रोहित पवारांना मोकळीक?

हेमंत देसाई म्हणाले, रोहित पवार यांनी देखील यात्रा काढली होती. हे देखील खरं आहे. पण ते स्वतंत्र दिसत होती. त्यांचे नेतृत्व देखील पुढे येत आहे. पण ते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतात असं म्हणता येत नाही. त्यांना मोकळीक आणि स्वतंत्र दिसतं, असे चित्र सध्या दिसत आहे. त्यामुळे ते स्वतंत्रपणे त्यांची एक फळी निर्माण करत आहेत. शेवटी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत. त्यामुळे पक्षाच्या यशाचे श्रेय त्यांना जाते. असे गट प्रत्येक पक्षात असतात.

समजा शरद पवार निवृत्त झाले किंवा फारसे सक्रिय नाहीत, अशावेळी सुप्रिया सुळे लोकसभेत असल्यामुळे त्या केंद्रात काम करणार. यावेळी राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात नवीन सुत्र सोपवल्या जातील. कोणीतरी नवा माणूस असेल की जो रोहित पवार यांच्या पसंतीचा असेल किंवा युगेंद्र पवारांच्या जवळचा असले, असे देखील हेमंत देसाई यांनी स्पष्ट केले.

प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांना विधानसभेपूर्वी हारवायचे आहे का?

जयंत पाटील यांनी त्यांचे कार्यकर्तूत्व सिद्ध केलं आहे. एक अर्थमंत्री म्हणून देखील त्यांनी चांगले काम केले. प्रदेशाध्यक्ष पदावरुन त्यांना हटवण्यासाठी अजित पवार यांनी खूप काम केले. थेट संघर्ष न करता ते स्वतंत्र बुद्धी काम करतात ही जयंत पाटलांची शैली आहे. असा माणूस सहजासहजी लोटांगण घालनार नाहीत. विधानसभा निवडणुकीत मी लढले आणि सत्ता बदलेले असं पाटील म्हणाले. शरद पवार यांनी देखील मला चार महिने द्या, सत्ता बदलतो असे म्हटले आहे. त्यामुळे निवडणुकीत काय होत माहित नाहीत. सत्ता बदलली तर जयंत पाटील मंत्रिमंडळात जातील.

पण सध्या प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांना विधानसभेपूर्वी हारवायचे आहे का?  हे महत्वाचं आहे. कारण कुणाला तिकीट देणार हे महत्वाचं आहे. आपल्या गोतावळ्यातील लोकांना तिकीट द्यायचं असेल तर त्यासाठी जयंत पाटील यांना हलवण्याची शक्यता असू शकते, अशी शक्यता देखील हेमंत देसाई यांनी वर्तवली.

सांगलीत जयंत पाटील-भाजप एकसंघ?

सांगलीत चंद्रहार पाटील यांना तिकीट देण्यात जयंत पाटील यांचा हात होता, असे अनेकजण म्हणतात. हे पटण्यासारखं देखील आहे. कारण जयंत पाटील यांनी त्या काळात एक वक्तव्य सुद्धा केलं नव्हत. दोन घराण्यातील वाद देखील कारणीभूत आहे. वसंतदादा पाटील आणि राजारामबापू पाटील मोठा संघर्ष होता. नव्या पिढीत देखील तो झिरपत आला आहे. पण सांगलीत देखील जयंत पाटील यांचं नाक कापल्या गेलं, अशी चर्चा सांगली काँग्रेसमध्ये आहे. विशाल पाटील आण आणि विश्वजीत कदम यांच्या मनात जयंत पाटील यांच्याबद्दल राग आहे.

काही वर्षांपूर्वी भाजप आणि जयंत पाटील यांची संयुक्तपणे जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेत सत्ता होती. त्यामुळे सांगलीतं राजकारण जयंत पाटील आणि भाजप असं जूळवून असतं ते भाजपात जाणार, अशी चर्चा देखील होती. पण ते गेले नाहीत, असे देसाई यांनी सांगितले.

जयंत पाटलांकडून लोकसभेत मविआच्या विरोधात काम?

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात जयंत पाटील यांचा मतदारसंघ वाळवा - इस्लामपूर याठिकाणी जे मतदाधिक्क अपेक्षित होतं ते मिळालं नाही. त्यामुळे त्यांच्यावर ठपका ठेवल्या जात आहेत, त्यांनी मदत केली असती तर आघाडीचा उमेदवार निवडून आला असता. पण वंचित फॅक्टर देखील हातकणंगलेमध्ये टर्निंग पॉईंट ठरल्याचे हेमंत देसाई यांनी स्पष्ट केले. 

Rohit Pawar vs Jayant Patil
Jayant Patil: पवारांच्या राष्ट्रवादीत पुन्हा पडणार फूट? जयंत पाटील विरुद्ध रोहित पवार कलगीतुरा का रंगला.. जाणून घ्या सत्तेची लढाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com