'राज्यपालांनी राष्ट्रगीताचा अपमान करणं अपेक्षित नाही' - जयंत पाटील

Jayant Patil News
Jayant Patil Newssakal
Updated on

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Assembly Session 2022) आजपासून सुरु होत आहे. यावेळी राज्यपाल आपलं अभिभाषण करत असतात. दरम्यान त्यांच्या भाषणानंतर कामकाजाला सुरुवात होते. मात्र, सभागृहात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या या भाषणावेळीच मोठा गोंधळ झाला. या गोंधळामुळे राज्यपालांनी आपलं भाषण अर्ध्यावरच थांबवलं आणि ते निघून गेले. (Governer Bhagat Singh koshyari Speech)

सभागृहाचे काही नियम असतात, अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रगीताने होते असते, त्यानंतर राज्यपालांचं अभिभाषण झाल्यानंतर देखील राष्ट्रगीत होतं. पण गोंधळ होत असल्याने त्यांनी राज्यपालांनी त्यांचं भाषण आटोपतं घेतलं, आणि ते निघून गेले.

दरम्यान राष्ट्रवादीचे नेत जयंत पाटील म्हणाले की, 'हेड ऑफ द स्टेट यांनी राष्ट्रगीताचा मान राखला पाहिजी तो कार्यक्रमाचाच भाग असतो, आपलं भाषण कितीवेळ करायचं हा वेगळा भाग आहे. पण त्यानंतर भाषणाचा समारोप होऊन राष्ट्रगीतनंतर हा कार्यक्रम संपतो, पण या गोष्टीचं भान न ठेवता त्यांनी ताबडतोबीनं पायउतार होणं पत्करलं'

याची जवाबदारी आज ठेवायची असेल तर, भाजपच्या सभागृहातल्या चूकीच्या वर्तनाकडेच त्याची जवाबदारी द्यावी लागेल, त्यांच्या मुळेच राज्यपालांना सभाग्रह सोडावं लागलं, पण राष्ट्रगीताचा अपमान करण अपेक्षित नाही. असे जयंत पाटील म्हणाले.

Jayant Patil News
राहुल गांधींच्या प्रश्नावर भाजप म्हणतं, 'राजीव गांधी 1971 च्या युद्धात…'

राज्यपालांनी आपल्या अभिभाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याबरोबर सत्ताधाऱ्यांनी शिवाजी महाराजांच्या नावाची घोषणाबाजी केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजनेही मग 'नवाब मलिक हाय हाय'च्या घोषणा दिल्या. दरम्यान राज्यपालांचं भाषण होऊ शकलं नाही याला सत्ताधारी महाविकास अघाडी सरकार जवाबदार आहे असे अशिष शेलार म्हणाले तसेत राज्यपालांना सभागृह सोडून जावं लागलं याचं निंदा करतो असे ते म्हणाले.

Jayant Patil News
मुंबईकरांशी आयुक्त संजय पांडे करणार थेट संवाद; शेअर केला पर्सनल फोन नंबर

विधी मंडळाच्या इतिहासात पहिल्यांदा राज्यपाल भाषण सोडून गेल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रगीत न होताच राज्यपाल निघून गेले आहेत. सभागृहातील घोषणाबाजीमुळे राज्यपालांनी भाषण गुंडाळलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई आणि जोतिबा फुलेंचा अपमान केल्याचा ठपका ठेवत राज्यपालांविरोधात सत्ताधारी पक्ष विधीमंडळातआक्रमक झाल्याचं दिसून आलं. पायऱ्यांवर सत्ताधार्यांकडून राज्यपालांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच 'राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव' अशा घोषणाही देण्यात आल्या.

Jayant Patil News
युक्रेननेच विद्यार्थ्यांना ओलीस ठेवलं; रशियाच्या दाव्यावर भारताचे उत्तर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.