jayant patil: स्वतःला असं बघायला आवडेल..; प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या चर्चेत जयंत पाटलांचं सूचक विधान

अजित पवारांच्या वक्तव्यानंतर जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष पदावर प्रश्नचिन्ह उभे राहिलं आहे.
jayant patil maharashtra politics
jayant patil maharashtra politics Esakal
Updated on

अजित पवारांच्या वक्तव्यानंतर जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्ष पदावर प्रश्नचिन्ह उभे राहिलं आहे. त्यानंतर शरद पवार यांनी पक्षातील लोकांमध्ये यासंदर्भात चर्चा केली जाईल आणि त्यानंतर निर्णय होईल, असं म्हटलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चेला उधाण आलं. अशातच, जयंत पाटील यांचे एका ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. (Jayant patil says I prefer being portrayed as Civil Engineer working NCP Sharad Pawar Ajit Pawar ncp )

शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर जयंत पाटील राष्ट्रवादी सोडणार आणि त्याची १० कारणं भाजप ट्विटरवर शेअर केली. त्यामुळे जयंत पाटील खरचं राष्ट्रवादी सोडणार का? असा सवाल राजकीय गोटात उपस्थित झाला.

दरम्यान, जयंत पाटील यांनी एक ट्विट केले आहे. ज्यामध्ये त्यांनी इंजिनियर बनून मोठे प्रोजेक्ट्स उभे करावेत अशी इच्छा व्यक्त केली आहे.

नेमकं काय म्हटलं आहे ट्विटमध्ये?

अमित वानखडे यांचे या आर्टिफिशियल इंटेलिजन्स द्वारे तयार केलेल्या पेंटिंगसाठी मनापासून आभार!

पुढील चित्रात मला स्वतःला सिव्हिल इंजिनियर म्हणून बघायला आवडेल, कारण इंजिनियर बनून मोठे प्रोजेक्ट्स उभे करावेत, असे मला लहानपणासून वाटायचे.

जयंत पाटील हे महाराष्ट्रातील राजकारणी असून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत. सध्या ते इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. ते १९९० पासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांचे वडील राजारामबापू पाटील हे काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते होते. त्यांनी अर्थमंत्री, गृहमंत्री आणि जलसंपदा मंत्री अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यांनी अमेरिकेत जाऊन सिव्हिल इंजिनिअरींगचं शिक्षण घेतलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.