Jayant Patil: लोकसभेनंतर जयंत पाटलांना कोणाकोणाचे फोन? माजी गृहमंत्र्यांचा खळबळजनक दावा; विधानसभेच्या तोंडावर राजकीय भूकंप? 

Sharad Pawar: लोकसभेतील या अपयशानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमधील आमदारांमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या राजकीय भविष्याबाबत असुरक्षितता निर्माण झाल्याची चर्चा सुरू आहे.
Jayant Patil NCP
Jayant Patil NCPEsakal
Updated on

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपसह महायुतीचा महाविकास आघाडीने धुव्वा उडवला. यामध्ये भाजपची 9 जागांवर घसरण झाली, शिंदेच्या शिवसेनेला 7 जागा मिळाल्या तर सर्वाधिक फटका अजित पवार यांच्या राष्ट्रावादीला बसला. कारण या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.

लोकसभेतील या अपयशानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमधील आमदारांमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या राजकीय भविष्याबाबत असुरक्षितता निर्माण झाल्याची चर्चा सुरू आहे.

अशात माजी गृहमंत्री आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी या सर्व घडामोडींवर खळबळजनक दावा केला आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नुकतीच पत्रकारांशी बातचीत केली. यावेळी बोलताना ते म्हणाले,"लोकसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर आम्हाला सोडून गेलेल्या आमदारामध्ये मोठ्या प्रमाणत चुळबूळ सुरू झाली आहे. त्यामुळे आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह आम्हा अनेकांना त्यांचे फोन येत आहेत. त्यामुळे पक्षाची काय भूमिका आहे हे लक्षात घेऊन पढील काळात त्यांच्याबाबत निर्णय घेण्यात येतील."

Jayant Patil NCP
Manoj Jarange: "मी मराठ्यांवर अन्याय होऊ देणार नाही," जरांगेंची आक्रमक भूमिका; आरक्षणाचा प्रश्न पेटणार

दरम्यान गेल्या जुलैमध्ये अजित पवार यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडत महायुती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. त्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा विरोध होता. अशात अजित पवार यांच्याबरोबर पक्षातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांसह 40 आमदरांनी बंडखोरी केली होती.

या दरम्यान शरद पवार यांच्याकडे काही मोजकेच आमदार व नेते राहिले होते. त्यानंतर या सर्वांना बरोबर घेत शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीत 8 जागांवर विजय मिळवत दमदार कामगिरी केली होती.

Jayant Patil NCP
Laxman Hake: लक्ष्मण हाके उपोषण मागे घेणार? वाचा, बैठकीत काय काय घडले

शरद पवार यांच्या पक्षाची कामगिरी पाहता अजित पवार यांच्याबरोबर गेलेल्या अनेक आमदारांना वाटत आहे की, त्यांनी चुकीचा निर्णय घेतला आहे. आणि म्हणून आता त्यांना पुन्हा एकदा शरद पवार यांच्याकडे यायचे असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.