सांगलीः २०१९ च्या महापूराच्या कारणांबाबत आजही मंथन सुरुच आहे. मात्र त्याच्या अनेक कारणांपैकी कृष्णा खोऱ्यातील कोयना, वारणा, धोम, कण्हेर, दुधगंगा(Koyna, Warna, Dhom, Kanher, Dudhganga)तसेच कर्नाटकातील अलमट्टी धरणांमधून (Almatti dams)अनियमित आणि अयोग्य पध्दतीने सोडलेले पाणी हेही एक कारण आहे. या कारणाबाबत महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील जलसंपदा विभागाच्या अधिकारी स्तरावर अनौपचारिकरित्य मान्यता आहे. त्यामुळे आता उद्या जलसंपदा मंत्री जयंत पाटील(jayant patil) कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा (Yeddyurappa)यांच्यातील बैठकीत धरणे कधी आणि कशी भरायची यावर ठोस असे धोरण निश्चित करण्याची गरज आहे. (jayant-patil-yediyurappa-meeting-koyna-almatti-dam-sangli-marathi-news)
महापूराच्या कारणमिमांसेबाबत राज्य सरकारने नंदकुमार वडनेरे समिती नियुक्त केली होती. या समितीचा अंतिम अहवाल अजूनही प्रतिक्षेत आहे. गतवर्षी जलसपंदा विभागातील सेवानिवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण आणि प्रभाकर केंगार यांनी राज्य सरकारला धरण पाणी साठ्याबाबत धोरण निश्चित करणारा सविस्तर अहवाल सादर केला होता. या दोघांचाही गेली चाळीस वर्षे कृष्णा खोऱ्यातील पाऊस आणि धरणांशी या दोघांचाही नोकरीच्या निमित्ताने जवळून संबध आला आहे. गतवर्षीच्या महापूराच्या कारणांचा सखोल अभ्यास करून त्यांचा हा अहवाल दोन्ही राज्यांसाठी मार्गदर्शक आहे.
दिवाण म्हणाले,‘‘ प्रशासनाने 1 जुलैपासून या सर्व धरणांमधून पाणी विसर्गाचे धोरण निश्चित केले पाहिजे. धरणे भरून घेण्याचा हव्यास करण्याची काहीही गरज नाही. नियोजन, नियंत्रण, दक्षता आणि प्रशासकीय समन्वय ठेवला तर महापूराचा धोका टाळला जाऊ शकतो. जलआयोगाने पाणलोट क्षेत्र व तेथील धरणांचा अभ्यास करून नियोजन केले आहे. त्याचे काटेकोर पालन व्हावे. जल आयोगाने पाणलोट क्षेत्र व तेथील धरणांचा अभ्यास करून सूचना केल्या आहेत. कृष्णा पाणलोट क्षेत्रातील सर्व धरणांत 31 जुलैपर्यंत क्षमतेच्या 50 टक्के, 31 ऑगस्टपर्यंत 77 टक्के तर 15 सप्टेंबरपर्यंत धरणे 100 टक्केच पाणी साठा करावा, असे सांगितले आहे. याआधीच्या चूका टाळा. अलमट्टी धरणाची पाणी पातळी आत्ता 517.60 मीटर इतकी झाली आहे.
२०१९ मध्ये अलमट्टीची एवढी पाणी पातळी आल्यानंतरच महापूर ओसरायला सुरवात झाली होती. त्यामुळे ही पाणी पातळी आधीपासून असणे धोक्याचे आहे. गतवर्षीही आँगस्टमध्ये महाराष्ट्रातील राजापूर बंधाऱ्यातून होणारा विसर्ग मंदावला होता. गतवर्षी चार ऑगस्टला सांगलीत आयर्विनची पाणी पातळी 16 फुट होती. ती दिवसांत आठ फुटांनी उतरली. मात्र राजापूर बंधाऱ्यात पाणी पातळी स्थिरच होती. ती काही केल्या कमी होत नाही. हा धोका ओळखायला हवा. त्यामुळेच गतवर्षी इचलकरंजी आणि कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती तयार झाली होती. यंदा आत्ताच पुरपरिस्थिती तयार झाली आहे. याकडे दोन्ही राज्यातील अधिकाऱ्यांनी गांभिर्याने पहावे.’’
सूत्र काय?
कृष्णेवरील सर्व धरणांमध्ये 31 जुलैपर्यंत क्षमतेच्या 50 टक्के ठेवा
31 ऑगस्टपर्यंत 77 टक्के तर 15 सप्टेंबरपर्यंत धरणे 100 टक्केच पाणी साठा करा.
अलमट्टी धरणातील पाणी पातळी 31 आॕगस्टपर्यंत 517 मीटर पर्यंत ठेवा
धरण परिचलनासाठी आयोगाच्या सूचनांनुसार संपुर्ण पावसाळ्यात पाणी विसर्गाचे संयुक्त धोरण ठरवले पाहिजे.
तुर्त पुढील दोन महिने धरणे पुर्ण क्षमतेने न भरता किमान वीस टक्के ती रिकामी ठेवली पाहिजेत.
नुकसान काय?
दिवाण म्हणाले,"" पश्चिम घाटात दरवर्षी गेल्या साठ वर्षात धरणांच्या क्षमतेच्या कितीतरी अधिक पट पाऊस झाल्याच्या नोंदी आहेत. कोयना धरणाच्या इतिहासात एकदाच 1994-95 मध्ये ते 82 इतके भरले आहे. सप्टेंबरनंतरही पाणलोट क्षेत्रातील पाझरामुळे धरणे भरली जातातच. त्यामुळे ती आधीपासून शंभर टक्के भरून ठेवण्याची आजिबात गरज नाही. यदाकदाचित 20 टक्के धरण भरलेच नाही तर वीज निर्मितीवरच परिणाम होऊ शकतो. तो देखील अवघी एक मे.वॅट वीजनिर्मितीच कमी होईल. ही वीज आपण 300 कोटी रुपये खर्च केले तरी अन्य राज्यांकडून खरेदी करू शकतो.
मुळात अशी वेळ येणार नाहीच. पण आली तरी हरकत नाही कारण पुरामध्ये काही हजार कोटींचे नुकसान होण्यापेक्षा हे बरेच. शिवाय ही रक्कम आपण आपल्याच देशातील अन्य राज्याला देणार आहोत. त्याचवेळी शेतीसाठी लागणारी पाण्याची गरज पुर्ण होण्यासाठी धरणे ऐंशी टक्के भरली तरी पुरेसे ठरते. सर्व सिंचन योजनांची पाण्याची गरज घेतली तरीही. कारण आजवरच्या इतिहासात दरवर्षी पावसाळ्यापुर्वी धरणे पुर्णपणे रिकामी झाली आहेत असे कधीही झालेले नाही. उलट पंधरा ते पंचवीस टक्के पाणीसाठा सर्व धरणांमध्ये शिल्लकच राहिला आहे.''
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.