Jayant Patil: सुनील तटकरेंच्या गळाभेटीवेळी काय घडलं? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं..

विधानभवनाच्या परिसरात सुनील तटकरे आणि जयंत पाटील गप्पा मारताना दिसले
Jayant Patil
Jayant PatilEsakal
Updated on

पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू झाला आहे. अधिवेशनामध्ये इर्शाळवाडीची दुर्घटना, राज्यातील पूरस्थिती, आमदार निधीवाटपाच्या मुद्द्यांवरून विधानसभा आणि विधान परिषदेत खडाजंगी झाल्याचे दिसुन आले. विरोधक-सत्ताधारी यांच्यात वेगवेगळ्या मुद्द्यावरून जुंपल्याचं दिसून आलं. या विविध मुद्द्यांवरून विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपलेली असतानाच विधानभवन परिसरातील एक फोटो सोशल मीडियावर चांगला व्हायरल झाला आणि पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात हो फोटो चर्चेचा विषय ठरला.

अजित पवार गटाचे नेते सुनिल तटकरे आणि शरद पवार गटाचे जयंत पाटील यांचा एक फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला. मात्र, या फोटोवरून जयंत पाटलांनी माध्यमांशी संवाद साधत स्पष्टीकरण दिलं आहे.

भेटीबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, 'माझ्या भेटीचा आणि राजकारणाचा संबंध नाही. हल्ली माणूस म्हणून माणसांशी बोलणे कठीण झाले आहे. डोक्यात काठ्यांच घालणे अपेक्षित आहे का? आम्ही काही खाजगी चर्चा केली. आमच्यात राजकीय चर्चा झाली नाही. त्यांनी ठरवले ते पवार साहेबांना सोडून गेले आहेत. पवार साहेब जे सांगतील तेच आम्ही ऐकू', असंही पुढे जयंत पाटील म्हणाले आहेत.

Jayant Patil
BJP vs MNS: "फक्त फोडू नका बांधायला देखील शिका !", भाजपने केलं अमित ठाकरेंना टार्गेट?

तर मणिपूर प्रकरणावर बोलताना जयंत पाटील यांनी भाजपला लक्ष केलं आहे. महिला बेपत्ता प्रकरणात चर्चेसाठी आम्हीच मुद्दा उपस्थित केला आहे. एफआयआर दाखल झाला त्यांना अटक केले जात नाही. तर भारतात कायदा सुव्यावस्था किती ढासळली आहे. हे मणिपूर घटनेमुळे दिसून आले. मणिपुरमध्ये भाजपचे सरकार आहे. देशात सुद्धा भाजपचे सरकार आहे. तिथे लोकांना असुरक्षित वाटत आहे. महिलांना मारण्यात आले. मणिपूरमधील हिंसा थांबवण्यासाठी सरकारने आर्मी पाठवायला हवी होती. दोन जमाती एकमेकांविरोधात पेटल्या आहेत असंही जयंत पाटील म्हणाले आहेत.

Jayant Patil
Accident News: ढाब्यावरील जेवणाची ती भेट ठरली शेवटची, घरी जाताना दोन जिवलग मित्रांचा अपघातात जागीच मृत्यू, तर १ गंभीर जखमी

तर भारतातील कोणत्याही सुशिक्षित माणसाला लाज वाटेल असा प्रकार सुरू आहे. सरकार काहीच करत नाही. म्हणून आम्ही राज्यभरात निषेध करत आहोत. मणिपुरमधल्या घटनेचा आम्ही निषेध करत आहोत. या प्रकरणावर आपच्या खासदारांनी प्रश्न उपस्थित केला, चर्चेची मागणी केली तर त्यांना निलंबीत करून टाकले जाते, असंही जयंत पाटील म्हणाले आहेत.

Jayant Patil
Ajit Pawar : मुख्यमंत्रिपदाची भविष्यवाणी करणं नेत्यांच्या अंगलट! अजितदादांकडून समर्थक नेत्यांची खरडपट्टी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.