Jayant Patil: सरकार टिकण्यासाठी घोषणांचा पाऊस; जयंत पाटलांचा निशाणा

NCP Sharad Pawar: . राज्यात आपली सत्ता असताना अरुण गुजराथी अर्थमंत्री होते तेव्हा कर्ज काढण्याची वेळ आपल्या सरकारवर आली नव्हती.
Jayant Patil: सरकार टिकण्यासाठी घोषणांचा पाऊस,जयंत पाटलांचा निशाणा
Jayant Patilsakal
Updated on

latest Marathi News : राज्य सरकार घोषणाबाजीत बुडाले आहे. राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे अन्‌ घोषणांचा पाऊस सरकार पाडत आहे. महायुतीचे सरकार भेदरले आहे. पुन्हा सत्तेत येण्यासाठी आता ते कपडे काढायलाही मागे पुढे पाहणार नाही.

माझी लाडकी बहिण योजना महिलांसाठी नाही, तर सरकार टिकून राहण्यासाठी आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज येथे केली.

पक्षाच्या जिल्हास्तरीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री डॉ.सतीश पाटील, महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे आदी उपस्थित होते.

Jayant Patil: सरकार टिकण्यासाठी घोषणांचा पाऊस,जयंत पाटलांचा निशाणा
Jayant Patil : घटक पक्षांशी चर्चा करूनच जागावाटप; जयंत पाटील

पाटील म्हणाले, की महाराष्ट्रावर सात लाख कोटींचे कर्ज आहे. आता पुन्हा एक लाख १० हजार कोटींचे कर्ज राज्य सरकार काढत आहे. कर्ज काढून घोषणांचा पाऊस सरकार पाडत आहे. कर्जाचा भार आपल्यावरच येणार आहे. राज्यात आपली सत्ता असताना अरुण गुजराथी अर्थमंत्री होते तेव्हा कर्ज काढण्याची वेळ आपल्या सरकारवर आली नव्हती.

ते म्हणाले, की कांदा उत्पादक, केळी उत्पादक शेतकरी राज्य सरकारवर नाराज आहेत. शेतकऱ्यांना हमीभाव दिला जात नाही. पीक विम्याचे पैसेही दिले जात नाहीत. कांदा निर्यात बंदी करून शेतकऱ्यांच्या डोळ्यात महायुतीने आसवे आणली. गेल्या पाच महिन्यांत १ हजार ७६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्यात बेरोजगारीचा दर ९ वरून १८ टक्क्यांवर गेला आहे. गरीबांची मुले स्पर्धा परिक्षा देतात. मात्र पेपरफुटीमुळे त्यांचे वर्ष वाया जात आहे, असेही ते म्हणाले.

Jayant Patil: सरकार टिकण्यासाठी घोषणांचा पाऊस,जयंत पाटलांचा निशाणा
Jayant Patil : यांच्या पराभवावरून शरद पवारांनी नाराजी दाखवली बोलून

तुरुंगात जाण्यापेक्षा ‘भाजपा’त जा

जयंत पाटील म्हणाले, की राज्यात महायुती सरकारने २५ राजकीय नेत्यांवर गैरव्यवहाराचे आरोप करून ईडी, आय.टी.चे छापे टाकून कारवाया सुरू केल्या होत्या. त्यापैकी २३ नेते भाजपमध्ये गेल्याने त्यांच्यावरील कारवाया थांबविल्या आहेत. तुरुंगात जाण्यापेक्षा भाजपमध्ये गेलेले चांगले, असे हे नेते म्हणताहेत. या नेत्यांनी किती कोटींचा गैरव्यवहार केला, हे जनतेसमोर यायला हवे, अशी मागणीही त्यांनी केली.

Jayant Patil: सरकार टिकण्यासाठी घोषणांचा पाऊस,जयंत पाटलांचा निशाणा
Jayant Patil: ठाकरेंनी तिसरा उमेदवार दिला, शरद पवार नाराज? जयंत पाटलांनी सांगितलं निवडणुकीत गेम कसा झाला?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.