स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या - आव्हाड

Jitendra Awhad
Jitendra Awhad Jitendra Awhad
Updated on

निवडणुका आल्या की इव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातो. इव्हीएममध्ये घोळ करून निवडणूक जिंकल्याचा आरोप विजेत्या पक्षांवर केला जातो. नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत इव्हीएममध्ये घोळ करून भाजपने विजय संपादन केल्याचा आरोप झाला. यामुळेच की काय स्थानिक स्वराज्य संस्थानची निवडणूक (Local Body Election) बॅलेट पेपरवर (Ballot paper) घेण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्विटद्वारे केली आहे.

निवडणूक आल्यावर ईव्हीएमवर (EVM) संशय घेणे काही नवीन राहिलेले नाही. स्वतः विजयी होत असता कोणीही संशय घेत नाही. मात्र, पराभवाचा सामना करावा लागला की इव्हीएमवर आरोप केले जातात. असाच प्रकार नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या निकालानंतर झाला. आता महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहे. या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केली आहे.

‘अनेक राज्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर (Ballot paper) घेतल्या आहेत. तो संबंधित राज्याचा निर्णय असतो. महाराष्ट्रानी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body Election) बॅलेट पेपरवर घ्याव्या’, अशी मागणी आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्विटद्वारे केली आहे. तसेच हे ट्विट उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवार, नाना पटोले आदींना ट्विट टॅग केले आहे.

Jitendra Awhad
रशियाने केलेल्या गोळीबारात अमेरिकन पत्रकाराचा मृत्यू; दुसरा जखमी

महाराष्ट्रात पुढे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका

महाराष्ट्रात काही ठिकाणी महापालिका, जिल्हा परिषद, नगर पालिका, ग्रामपंचायत अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body Election) होऊ घातल्या आहेत. यातही घोळ झाल्याचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. त्यामुळे पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही भाजपला बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याचे आवाहन दिले होते, हे विशेष...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.