मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एक खळबळजनक ट्वीट केलं आहे.
मागील काही दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात अनेक घडामोडींनी वेग घेतला आहे. त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलं आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह (BMC) अनेक जिल्ह्यात नेतेमंडळी मोर्चेबांधणीच्या तयारीला लागले आहेत. यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोपप्रत्यारोपांचे सुत्र सुरुच आहे. दरम्यान, आता मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी (Jetendra Awhad) एक खळबळजनक ट्वीट केलं आहे. त्यामुळे नव्या चर्चांना उधाण आलं आहे.
यात ते म्हणतात, दलित माणूस या देशाचा राष्ट्रपती होऊ शकतो ही संविधानाने (Constitution) दिलेली देणगी आहे. दलित माणूस आपल्या लग्नात घोड्यावर बसू शकत नाही ही जातीव्यवस्थेची करण आहे!, असा उपरोधिक टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे.
दरम्यान, काल स्मृती इरानी यांनी सायकल वरून प्रवास करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावरही त्यांनी ट्वीट करत ते म्हणतात, पोट खपाटीला गेलेले गरीब रेशन आणण्यासाठी सायकलने जातात आणि अति खाऊन पोट सुटलेले श्रीमंत पोट कमी करण्यासाठी सुद्धा सायकलच चालवतात. तिची चेष्टा नको महोदय!, असे म्हणत त्यांनी स्मृत इरानी आणि पंतप्रधान मोदी (PM modi) यांनाही टोला लगावला आहे.
दरम्यान, आता या जातीवाचक ट्वीटमुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्यांच्या या विधानाने आता पुन्हा राजकारण तापण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आता विरोधकांकडून यावर कोणती प्रतिक्रिया येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.