ठाणे : ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना फेसबुक पोस्ट टाकण्यावरून शिंदे गटातील महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचं प्रकरणं चांगलंच तापलं आहे. ठाकरे गटाकडून आज (५ एप्रिल) रोजी सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड हे देखील सहभागी झाले. यावेळी आव्हाडानी सत्ताधारी पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला.
आव्हाड यावेळी बोलताना म्हणाले की, रोशनी शिंदे यांनी वर्षभरात लिहिलेल्या पोस्ट वाचल्या. त्यांनी कुठेही एकही अश्लिल शब्द वापरलेला नाही. त्यांनी टाकलेल्या पोस्ट शिवसेनेच्या संस्कारातील होत्या असेही आव्हाड म्हणाले.
हेही वाचा - सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत
संस्कार विचारल्याबद्दल तुम्ही जाऊन तिला मारता हे तुमचे संस्कार? मारता तर कुठे मारता.. ती सांगतेय माझं गर्भाशयाचं, आयव्हीएफचं ऑपरेशन सुरू आहे. म्हणजे ती आई होऊ नये या प्रकाराने तिला लाथा घातल्या गेल्या. मारू नका म्हणून ती सांगत असताना मारहाण झाली. एका स्त्रीला आई होण्यापासून रोखणं हे जगातील सर्वात मोठं पाप आहे असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
माझ्या पोरीला धमकी आली...
आव्हाड पुढे बोलताना म्हणाले की, त्या रोशनीला आई होऊ नये म्हणून मारताय, तिची चूक काय आहे. ती फक्त तुमचे संस्कार काढतेय. तुमच्या त्या कृत्यामुळे तुमचे संस्कार जगभारात गेले. याची नोंद देशाने घेतली असेही आव्हाड यावेळी म्हणाले. माझ्या पोरीला धमकी आली, व्हायरलं व्हिडीओ आला. मी आमदार म्हणून तीनदा तक्रार केली पण पोलिसांना ब्र सुद्धा लिहीता आला नाही असेही आव्हाड यावेळी म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.