राजकारणात वाद असावेत द्वेष नाही, लवकर बरे व्हा : आव्हाड

राज ठाकरे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असल्याची माहिती नुकतीच ट्विट करून दिली आहे.
mns latest political news
mns latest political news
Updated on
Summary

राज ठाकरे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असल्याची माहिती नुकतीच ट्विट करून दिली आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर हिप बोनची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. तब्बल दीड तासानंतर ही शस्त्रक्रिया पार पडली आहे. राज ठाकरे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असल्याची माहिती नुकतीच ट्विट करून दिली आहे. दरम्यान, आता मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करत लवकर बरे व्हा अशी ईच्छा व्यक्त केली आहे. (jitendra awhad says on raj thackeray get well soon)

मंत्री आव्हाड यांनी यासंदर्भात एक ट्वीट केल आहे. यात ते म्हणतात, राज ठाकरे आपल्यावर यशस्वी शस्त्रक्रिया होऊन आपण घरी परतल आहात. आपण लवकरच पूर्णपणे बरे व्हाल ही आई भवानीकडे प्रार्थना! आपण मी कोरोना काळात आजारी असताना माझ्या कन्येकडे आस्थेने विचारपूस केली होती, हे मी विसरलेलो नाही. राजकारणात वाद असावेत द्वेष नाही.. असं म्हणत त्यांनी त्यांच्या तब्यतेसाठी प्रार्थना केली आहे. (mns latest political news)

mns latest political news
शिंदेंचा मविआला थेट इशारा, आमदार कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी...

आपल्या आर्शिवादाने आणि प्रार्थनेने माझी शस्त्रक्रिया व्यवस्थितरीत्या पार पडली आहे. काही वेळापूर्वीच, रुग्णलातून बाहेर पडून मी घरी पोहचलो आहे. आपले आर्शिवाद आणि प्रेम असेच कायम राहो! आपला नम्र राज ठाकरे. अशा आशयाचे ट्विट शेअर करत राज ठाकरे यांनी डिस्चार्ज मिळाला असल्याची माहिती दिली आहे.

दरम्यान, राज ठाकरे 18 जूनला मुंबईतल्या लिलावती रुग्णलायत दाखल झाले होते, त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. पायाचं दुखणं वाढल्यामुळे त्यांना शस्त्रक्रिया करण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला होता. याआधी एक जूनला शस्त्रक्रिया होणार होती. पण राज ठाकरे यांना कोरोनाचा (Corona) संसर्ग झाल्याने शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती.

कोरोनाकाळात मंत्री आव्हाड यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांच्या मुलगीकडे आव्हाडांच्या तब्यतेची विचारपूस केली होती. दरम्यान, यावेळी आव्हाड यांनी ठाकरेंच्या तब्येतीची विचारपूस करत लवकर बरे व्हाय यासाठी आई आईभवानीकडे प्रार्थना, असं स्पष्ट केलं आहे. राजकारणात वाद असावेत द्वेष नाही असंही ते म्हणाले आहेत. सध्या राज्याचं राजकीय वातावरण गढूळ झालं असंल तरी आव्हाड यांच्या या ट्वीटने मात्र राजकीय वर्तुळात चर्चांना ऊत आला आहे.

mns latest political news
Gujrat Riots: मोदींनी भगवान शंकराप्रमाणे विषप्राशन केलं - अमित शाह

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.