Jitendra Awhad: तुमच्या नवऱ्याचं किंवा नेत्याचं अर्धनग्न छायाचित्र...; चित्रा वाघ यांना आव्हाडांचा संतप्त सवाल

Jitendra awhad to bjp chitra wagh what if half-naked picture of your husband or leader is circulated anant karmuse case
Jitendra awhad to bjp chitra wagh what if half-naked picture of your husband or leader is circulated anant karmuse case
Updated on

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड हे मागील काही दिवसांपासून चर्चेत आहेत. हर हर महादेव चित्रपटात इतिहासाचीम मोडतोड केल्याविरोधात त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली होती, त्यानंतर क एका महिलेनं दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर आव्हाडांवर राजकीय क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात टीका झाली. यातच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ज्यांनी घरी बोलावून एकाला बेदम मारहाण केली, त्यांना कायदा-सुव्यवस्थेवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही असं म्हटलं, यावर आव्हाडांनी प्रतिक्रिया दिली आहे.

"ज्या माणसाने २०१६ ते २०२० माझा पाठलाग केला. ट्वीटर फेसबुक चा वापर करत बदनामी केली. ब्लॉक केल्यानंतरही दुसऱ्या मार्गाने तो मला त्रास देतच राहिला टीका करणाऱ्यांनो तुमच्या भावाच,तुमच्या वडिलांचं किंवा तुमच्या स्वतःच अशाप्रकारे नग्न छायाचित्र काढलं गेलं असतं तर किंवा इतके वर्षे त्रास दिला गेला असता तर आपण काय केलं असतं?" असा सवाल आव्हाड यांनी विचारला आहे.

पुढे आव्हाड म्हणाले आहेत की, "चित्राताई आपल्या नवऱ्याचं किंवा आपल्या नेत्यांच अर्धनग्न छायाचित्र जर प्रसारीत झालं असतं तर आपण काय केलं असतं. याचे उत्तर कधीतरी द्या. २०१६ ते २०२० त्याने काय केलं हे जरा कधीतरी बोलावून विचारा आणि मग टीका करा." करमुसे मारहाण प्रकरणावरून चित्रा वाघ आव्हाडांवर टीका करताना म्हणाल्या होत्या की, ज्यांनी घरी बोलावून एकाला बेदम मारहाण केली, त्यांना कायदा-सुव्यवस्थेवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही.

हेही वाचा - Gautami Patil Lavani: गौतमीची लावणी कुठे चुकतेय?

Jitendra awhad to bjp chitra wagh what if half-naked picture of your husband or leader is circulated anant karmuse case
Maharashtra Politics: अजित पवारांना बोलण्याचा काही अधिकार नाही; मंत्र्यांच्या सुरक्षेवरून भाजपचे प्रत्युत्तर
Jitendra awhad to bjp chitra wagh what if half-naked picture of your husband or leader is circulated anant karmuse case
Shivsena: उद्धव ठाकरेंना धक्क्यावर धक्के! आता धनुष्यबाणासंदर्भात दिल्ली हायकोर्टानेही...

करमुसे प्रकरण काय आहे?

सिव्हिल इंजिनिअर अनंत करमुसे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्याविषयी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केली होती. या पोस्टनंतर ५ एप्रिलला रात्री करमुसे यांना पोलीस आव्हाड यांच्या बंगल्यावर घेऊन गेले होते. त्यानंतर १५ ते २० जणांनी त्यांना बेदम मारहाण केल्याचा आरोप करमुसे यांनी केला होता. मारहाणीच्या वेळी आव्हाड देखील बंगल्यात उपस्थित होते असा करमुसे यांच्या तक्रारीत उल्लेख आहे. हे प्रकरण चांगलेच तापले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.