Sunil Tatkare: साहेबांनी अजितदादांना वेडं बनवल्याचं आव्हाडांनी खरं सांगितलं; तटकरे असं का म्हणाले?

लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सध्या आत्मपरीक्षण सुरु आहे.
Sunil Tatkare
Sunil Tatkaresakal
Updated on

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सध्या आत्मपरीक्षण सुरु आहे. या अनुषंगानं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत अनेक बाबींवर भाष्य केलं. त्याचबरोबर अजित पवारांविरोधात जाणीवपूर्वक नरेटिव्ह तयार केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. यासाठी त्यांनी आव्हाडांच्या एका विधानाचा दाखला दिलं. (Jitendra Awhad told truth that Sharad Pawar made Ajit Pawar mad says Sunil Tatkare)

Sunil Tatkare
Pune Porsche Accident : अल्पवयीन आरोपीचा बालसुधारगृहातील मुक्काम १४ दिवसांनी वाढणार? पोलिसांचा बाल न्याय मंडळाला अर्ज

तटकरे म्हणाले, "एक गोष्ट आम्हाला प्रकर्षानं जाणवलं की, मतदानाची तारीख जसजशी जवळ येत गेली तसंतसं अजितदादांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला गेला. त्याबद्दल एक विशेष मोहिम राबवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला गेला. यामध्ये त्यांना यश आलं ते आम्ही समजून घेण्यात कमी पडलो हे नाकारण्याची गरज नाही. पण या साऱ्या गोष्टी लक्षात ठेवून आम्ही काम करतो आहोत"

Sunil Tatkare
Delhi Water Crisis : टँकर माफियांना आवरा अन्यथा...; सर्वोच्च न्यायालयाचे दिल्ली सरकारला निर्देष

काल नगरला वर्धापन दिन साजरा झाला त्यात डॉक्टर (अमोल कोल्हे), वकील (जितेंद्र आव्हाड) आणि शरद पवार यांची भाषण ऐकली. यामध्ये आव्हाडांनी एका गोष्टीची कबुली दिली की, अजितदादांना शरद पवारांनी वेडं बनवलं, असं त्यांच्या भाषणात चार वेळेला आलं. म्हणजे जे आम्ही वर्षभर सांगत आलो की, २०१४, २०१९, २०२२ असेल किंवा नाराजीनामा दिला असेल त्या त्या वेळेला हे ठरलेलं असेल की भाजपसोबत जायचं हा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाला होता. हे जे आम्ही सांगत होतो ते त्यांनी वेगळ्या भाषेत सांगितलं आणि त्यावर शिक्कामोर्तब केलं. सत्य आज ना उद्या बाहेर येतंच. बोलण्याच्या नादात लोक कसे सत्य बोलतात हे यातून लक्षात येतं.

Sunil Tatkare
Mahayuti: काँग्रेसमधून महायुतीत आलेल्या नेत्यांच्या मतदारसंघात भाजप-सेना भुईसपाट, वाचा आकडे काय सांगतात

त्याचबरोबर जयंत पाटील यांना सांगावं लागलं व्यासपीठावरुन की चार महिने मी आहे तोपर्यंत तुम्ही थांबा. चार महिने सोशल मीडिायावर काही बोलू नका मी चार महिन्यांनंतर अध्यक्षपद सोडणार आहे. जी काही तक्रार करायची असेल ती पवारसाहेबांकडं करा, निवडणूक निकालानंतर पक्षाच्या अध्यक्षांना पक्षाच्या नेतृत्वांना सांगावं लागत असेल तर काय परिस्थिती आहे ते बघा. म्हणून काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यावर दगडं मारु नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.