Jitendra Awhad : 'चला झोपेतून तर उठले...'; आण्णा हजारेंचा कोर्टात खेचण्याचा इशाऱ्यावर आव्हाडांनी पुन्हा डिवचलं

जितेंद्र आव्हाडांविरोधात कोर्टात जाणार असल्याचे अण्णा हजारे म्हणाले आहेत.
Anna Hazare
Anna Hazare sakal
Updated on

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील नेते जितेंद्र आव्हाड आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्यात चांगलीच जुंपली आहे. अण्णा हजापे यांनी आव्हाडांनी केलेल्या एक्सवरीव पोस्टवरून कोर्टात जाणार असल्याचे म्हटले आहे. यानंतर जितेंद्र आव्हाडांनी पुन्हा एकदा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट केली असून पुन्हा अण्णा हजारेंना डिवचलं आहे.

'ह्या माणसाने या देशाचं वाटोळं केलं.. टोपी घातली म्हणजे कुणी गांधी होत नाही' अशी पोस्ट जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. यासोबत त्यांनी अण्णा हजारे यांचा फोटो देखील पोस्ट केला होता. यानंतर गुरुवारी सायंकाळी अण्णा हजारे यांनी माध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यासंबंधी वकिलांशी चर्चा करणार असल्याचं म्हटलं. त्यामुळे हे प्रकरण पेटताना दिसत आहे.

Anna Hazare
Mumbai Fire News: मुंबईतील गोरेगावमधील इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग, ७ जणांचा होरपळून मृत्यू ४६ जण जखमी

दरम्यान या इशाऱ्यानंतर आव्हाडांनी पुन्हा सोशल मीडियावर पोस्ट केली आहे, "माझ्या ट्विट नी ह्यांना जाग आली. कोर्टात खेचतो ह्याला म्हणजे मला असे पत्रकारांना म्हणाले. चला झोपेतून तर उठले बघू उद्या पासून जागे राहतात का" असे आव्हाड म्हणाले आहेत. आव्हाडांनी जुन्या पोस्टला रिप्लाय देत ही नवीन पोस्ट केली आहे. त्यामुळे आव्हाडांविरोधात अण्णा हजारे खरंच कोर्टात जाणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Anna Hazare
Anna Hazare : जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात अण्णा हजारे कोर्टात जाणार; काय म्हणाले अण्णा?

अण्णा हजारे काय म्हणाले?

आव्हाडांच्या ट्वीटबद्दल प्रतिक्रिया देताना अण्णा हजारेंनी आव्हाडांच्या पोस्टला उत्तर दिलं होतं. देशाचं वाटोळं केलं असं म्हणत असतील. पण मी एवढे कायदे केलेत त्यामुळे जनतेचा फायदा झाला आहे. माहितीचा अधिकार आज देशाला मिळाला आहे. माझ्या काही आंदोलनांमुळे यांच्या कार्यकर्त्यांचं वाटोळं झालं हे नाकारता येत नाही. यांचे बरेच कार्यकर्ते घरी गेले. ते त्यांना सहन होत नसेल म्हणून काहीतरी कुरापत काढायची आणि बदनामी करायची, असेही अण्णा हजारे म्हणाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()