Jitendra Awhad: 'छत्रपतींमुळे मंदिरं राहिली त्यांनाच…'; संयोगीताराजेंना 'वेदोक्त'वरून झालेल्या विरोधानंतर आव्हाड संतापले!

jitendra awhad tweet on oppose sambhaji raje wife sanyogita raje over vedokta in nashik kalaram temple controversy rak94
jitendra awhad tweet on oppose sambhaji raje wife sanyogita raje over vedokta in nashik kalaram temple controversy rak94
Updated on

Jitendra Awhad Tweet : छत्रपती संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगिताराजे छत्रपती यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. संयोगिताराजे छत्रपती यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये रामनवमीला वेदोक्त मंत्र म्हणण्यास महंतांनी मज्जाव केल्याचे म्हटले आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाडांनी ट्विट करत संताप व्यक्त केला आहे.

काळाराम मंदिराच्या सनातनी मनुवाद्यांचा माजोरडेपणा असे म्हणत आव्हाडांनी या प्रकारावर सडकून टीका केली आहे. तसेच छत्रपतींच्या वारसांना ही वागणूक मिळते तर बाकीच्यांचं काय? असा सवाल देखील जितेंद्र आव्हाड यांनी विचारला आहे. (Latest Marathi News)

jitendra awhad tweet on oppose sambhaji raje wife sanyogita raje over vedokta in nashik kalaram temple controversy rak94
Jitendra Awhad: आम्ही केलेलं चुकीचं, तुम्ही केलं तर... आव्हाडांनी नेमकी नाराजी कुणावर केली व्यक्त? पोस्ट व्हायरल

आव्हाड काय म्हणालेत?

काळाराम मंदिराच्या सनातनी मनुवाद्यांचा माजोरडेपणा, छत्रपती घराण्याच्या संयोगीताराजे भोसले यांच्या पुजेवेळी वेदोक्त मंत्राऐवजी, पुराणोक्त मंत्र म्हटले. त्यावेळी संयोगीताराजेंनी त्याना सुनावलं, छत्रपतींमुळे मंदिरं राहिली त्यांनाच वेदोक्त मंत्राचा अधिकार नाही? त्यांनी उत्तर दिले नाही तुम्हाला अधिकार नाही.

छत्रपती शिवरायांबरोबर सनातनी मनुवादी असेच वागले, छत्रपती संभाजी महाराजांना हीच वागणूक दिली. शाहू महाराजांना शुद्र म्हणाले हेच सनातन मनुवादी आजही छत्रपतींना शुद्र समजतात. (Marathi Tajya Batmya)

बरं झाले हे छत्रपतींच्या वारसांबरोबर झाले. जे मी सांगतो तो हाच सनातनी धर्म आजही ते वर्ण व्यवस्था आहे हे दाखवून देतात. अजुन कुठला पुरावा हवा, आजचे छत्रपतींच्या वारसांना ही वागणूक मिळते तर बाकीच्यांचं काय. बहुजनांनो डोळे उघडा हाच तो सनातन धर्म तो तुम्हाला शुद्रच मानतो.

हेही वाचा - जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

jitendra awhad tweet on oppose sambhaji raje wife sanyogita raje over vedokta in nashik kalaram temple controversy rak94
Pune Crime News : पुण्यात सेक्सटॉर्शनचा नंगानाच! ६४ वर्षीय आजोबांना व्हिडीओ कॉल करत लाखोंना लुटलं

काळाराम मंदीरात नेमकं काय घडलं?

नाशिकच्या काळाराम मंदिरातील महंतांनी दर्शनासाठी आलेल्या संयोगिताराजे यांच्यासमोर पुराणातील मंत्र म्हणण्याचा प्रयत्न केला. पण कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या वारशामुळे मी ठामपणे विरोध केला अशी पोस्ट छत्रपती संभाजीराजे यांच्या पत्नी संयोगीता राजे छत्रपती यांनी केली आहे.

पूजेदरम्यान काळाराम मंदिरातील महंतांनी संयोगीताराजे यांना वेदोक्त मंत्राचा अधिकार कसा नाही हे सांगायचा प्रयत्न केला होता. त्यावेळी संयोगिताराजे छत्रपती यांनी महंतांना खडे बोल सुनावत रामरक्षा म्हटली.

jitendra awhad tweet on oppose sambhaji raje wife sanyogita raje over vedokta in nashik kalaram temple controversy rak94
Delhi News : धक्कादायक! डास घालवण्याच्या औषधाने घेतला एकाच कुटुंबातील ६ जणांचा बळी

संयोगिताराजे छत्रपती यांनी पोस्टमध्ये नेमकं म्हटलंय?

हे श्रीरामा,

स्वतःला सर्वज्ञ समजून, माणसा-माणसात भेद निर्माण करणार्‍या,परमेश्वराच्या नावाने केवळ स्वार्थ साधू पाहणार्‍यांना सद्बुद्धि दे...

हीच आमची प्रार्थना,अन हेच आमुचे मागणे,

माणसाने माणसाशी माणसासम वागणे..

आपण सर्वजण देवाची लेकरे….आणि लेकरांनी आपल्या आईवडिलांना भेटण्यासाठी कोणाची परवानगी कशाला हवी? या विचारानेच राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी अनेक क्रांतिकारक असे निर्णय घेतले होते.

त्यांचा वैचारीक वारसा चालवण्याची जबाबदारी आणि त्यामुळे जे आत्मबल प्राप्त झाले त्यामुळेच परवा नाशिकमध्ये काळा राम मंदिरात महा मृत्युंजय मंत्राचा जप बिनदिक्कत करू शकले.

नाशिकच्या काळा राम मंदिरातील तथाकथित महंतांनी माझ्या पूजेसाठी पुराणातील मंत्र म्हणण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या वारशा मुळे मी ठामपणे विरोध केला.

अनेक कारणे देऊन त्यांनी मला वेदोक्त मंत्राचा अधिकार कसा नाही हे सांगायचा प्रयत्न केला. शेवटी मी विचारले की ज्या मंदिरांमध्ये तुम्ही आजच्या काळातही जे नियम लावत आहात ती मंदिरे वाचविली कोणी? छत्रपतींनी वाचविली!

मग छत्रपतींना शिकवण्याचे धाडस करू नका. तरीही मी महामृत्युंजय मंत्र जप का केला म्हणुन त्यांनी प्रश्न केलाच... तेव्हा मात्र परमेश्वराच्या लेकराला, आपल्या ईश्वराला भेटायला आणि त्याची स्तुती करायला तुमच्या मध्यस्थीची गरजच नाही, असे सुनावले. त्यानंतर मी तिथेच रामरक्षा पण म्हणली.

या प्रसंगाने माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला की शंभर वर्षात ही मानसिकता का बदलली नाही?अजूनही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सांगितलेल्या विचारांना खूप खोलवर रुजवावे लागणार आहे…अजूनही खूप प्रवास बाकी आहे...अजून खूप चालावे लागणार आहे… हे श्रीरामा, त्यासाठी बळ दे आणि सर्वांना ज्ञान दे!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()