Jitendra Awhad: राज्यात चार दिवसांत दोन दलित तरुणांची हत्या; आव्हाडांचा आंदोलन छेडण्याचा इशारा

दलित अत्याचाराविरोधात आंदोलन उभारणार
Jitendra Awhad
Jitendra Awhadesakal
Updated on

ठाणे: राज्यात चार दिवसांत दोन तरुण दलितांची हत्या झाली. पुरोगामी महाराष्ट्रात दलितांवर अत्याचार वाढत असताना त्याची साधी दखल घ्यायला मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना वेळ नाही. असा संताप व्यक्त करत राष्ट्रवादीचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

Jitendra Awhad
Talathi Bharti 2023: बेरोजगार युवकांच्या जखमेवर मीठ! सोशल मीडियावर व्हायरल तलाठी महाभरतीची जाहिरात बोगस?

चार दिवसांपूर्वी नांदेड येथील बोंढार या गावात जातीवादी गावगुंडांकडून अक्षय भालेराव या दलित तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. नांदेड येथील घटना ताजी असताना आज लातूर येथील रेणापूरमध्ये एका सावकाराकडून अवघ्या तीन हजार रुपयांसाठी गिरिधारी केशव तपघाले या मातंग तरुणाची हत्या केल्याचे समोर आले.

यावर राष्ट्रवादीचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे. समाजमाध्यमावर प्रतिक्रिया व्यक्त करत त्यांनी दलितांचा जीव हा जीव नाही का, दलितांचा जीव एवढा स्वस्त झाला आहे का असा सवाल उपस्थित केला.

Jitendra Awhad
Sharad Pawar : हे घडवलं जातंय! संगमनेर, कोल्हापूरच्या घटनांवरून पवारांचा सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप

राज्यात दलित सुरक्षित नाहीत. राज्यातील दलितांवरील होणारा अन्याय आम्ही सहन करणार नाही, असे म्हणत आरोपींना आम्ही सोडणार नाही. लवकरच राज्यभरात दलित अत्याचाराच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन आम्ही छेडणार असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, फुले- शाहू- आंबेडकरांच्या या महाराष्ट्रात अशा प्रकारच्या घटना घडणे हे अतिशय क्लेशदायक आणि दुर्दैवी बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.