Sharad Pawar in Kolhapur : जितेंद्र आव्हाडांना कोल्हापुरी चप्पल बसली की कळेल; मुश्रीफांचं चोख प्रत्युत्तर

Jitendra Awhad VS Hasan  Mushrif
Jitendra Awhad VS Hasan Mushrif
Updated on

Mumbai News - राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर दोन्ही गटाकडून सावध प्रतिक्रिया देण्यात येत होती. मात्र कोल्हापूरमधील सभेपासून राष्ट्रावादीच्या दोन्ही गटांत हल्ले प्रतिहल्ले सुरू झाले आहेत. यामध्ये जितेंद्र आव्हाड आणि अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ यांच्या वाद परेटला असून मुश्रीफ यांनी आव्हाड यांच्यावर जोरदार टीका केली.

Jitendra Awhad VS Hasan  Mushrif
वडेट्टीवार नवीन, आपण मोठे नेते असल्याचं त्यांना राहुल गांधींना दाखवायचं; भाजपचा टोला

जितेंद्र आव्हाड यांनी कोल्हापूर सभेत अजित पवार गटाच्या नेत्यांवर जोरदार टीका केली होती. आव्हाड यांनी अजित पवार गटाच्या नेत्यांना थेट गद्दार म्हटलं होतं. गद्दारी काही लोकांच्या रक्तातच असते, ते आता महाराष्ट्राला दिसत आहे.

जे साप बिळात होते, ते बाहेर पडले आहेत. या सापांना चेचण्यासाठी आपल्याला पायतानाचा वापर करावा लागेल. कोल्हापुरात पायतान प्रसिद्घ आहे. त्याचा उपयोग महाराष्ट्राने करावा, असा टोला आव्हाडांनी लगावला होता.

Jitendra Awhad VS Hasan  Mushrif
Education Board : दहावी-बारावी परीक्षेच्या धोरणात्मक निर्णयाला हरताळ; निकालापूर्वीच 'या' अभ्यासक्रमाचे प्रवेश उरकले जाणार

त्यावर हसन मुश्रीफ म्हणाले की, जितेंद्र आव्हाड मला फार ज्युनियर आहेत. त्यांनी पवार साहेबांवर काय जादू केली, मला माहित नाही. त्यांनी ठाण्यात पक्ष संपविण्याचं काम केलं आहे. त्यांनी अजित पवार आणि आमच्याविषयी असं बोलायला नको.

आम्ही सत्तेत जाण्यासाठी शरद पवारांना पत्र दिलं होतं. त्यात ५३ स्वाक्षऱ्या होत्या. त्यात त्यांचीही स्वाक्षरी होती. तेव्हा कुठं गेला होता तुझा धर्म असा सवाल करत मुश्रीफ म्हणाले, कोल्हापुरात चप्पल प्रसिद्ध नाही, कापशीची चप्पल प्रसिद्ध आहे. ती बसली की कळेल त्यांना, अस मुश्रीफ म्हणाले.

(Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()