सोलापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने बुधवारी संयुक्त पूर्व सेवा परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. शासनाकडून मागणीपत्रे प्राप्त झाली नसल्याने परीक्षा काही महिने पुढे गेल्या आहेत. आता महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ५ जानेवारी २०२५ रोजी तर महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २ फेब्रुवारीला घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.
कोरोनामध्ये दोन वर्षे अशीच वाया गेलेल्या तरुणांना ‘एमपीएससी’ने वार्षिक कॅलेंडरप्रमाणे वेळेत परीक्षा, निकाल लावावेत, एवढीच माफक अपेक्षा आहे. आयोगाने गतवर्षी सुरवातीच्या पाच महिन्यांतच घेतलेली संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ मध्ये झालीच नाही. आता विधानसभा निवडणूक होणार असल्याने ही परीक्षा थेट जानेवारी- फेब्रुवारीतच घेतली जाणार आहे. तत्पूर्वी, तीन महिन्यांपूर्वी आयोगाने राज्य शासनाला विविध विभागांकडील रिक्त पदांची मागणीपत्रे मागितली होती. ती मागणीपत्रे प्राप्त होताच आयोगाने दोन्ही परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत.
महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा
विविध मंत्रालयातील प्रशासकीय विभाग : ५४ पदे
एमपीएससी : १ पद
राज्य कर निरीक्षक : २०९ पदे
पोलिस उपनिरीक्षक : २१६ पदे
एकूण पदसंख्या : ४८० पदे
अर्ज करण्याचा कालावधी : १४ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर २०२४
परीक्षा : ५ जानेवारीला (३७ केंद्रांवर)
-------------------
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा
उद्योग निरीक्षक : ३९ पदे
कर सहायक : ४८२ पदे
तांत्रिक सहायक : ९ पदे
बेलिफ, लिपिक, गट-क, नगरपाल (शेरीफ), मुंबई कार्यालय : १७ पदे
लिपिक-टंकलेखक : ७८६ पदे
एकूण पदसंख्या : १,३३३ पदे
अर्ज करण्याचा कालावधी : १४ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर २०२४
परीक्षा :२ फेब्रुवारीला (३७ केंद्रांवर)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.