Crime News: भररस्त्यात पत्रकाराला मारहाण; राऊत शिंदे गटावर भडकले, "हे कायद्याचे राज्य आहे का?"

पाचोऱ्यातील पत्रकार संदीप महाजन यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी ट्विट केला आहे
Crime News
Crime NewsEsakal
Updated on

पाचोरा तालुक्यातील आमदार किशोर पाटील यांची अलीकडेच पत्रकार संदीप महाजन यांना शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली होती. त्यात आमदाराने पत्रकाराला मारहाण करण्याची धमकी दिली होती. याबाबत कुठलीही कारवाई न झाल्याने आता दिलेल्या धमकीप्रमाणे पत्रकाराला भररस्त्यात मारहाण करण्यात आली आहे.(Latest Marathi News)

पाचोरा तालुक्यातील पत्रकार संदीप महाजन यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. रिपोर्टींग करुन घरी जात असताना त्यांना काही जणांनी अडवून त्यांना जबर मारहाण केली आहे. या मारहाणीचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.

मुख्यमंत्र्यांवर टिकात्मक लिखाण केल्यामुळे आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर आता आमदार किशोर पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार संदीप महाजन यांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

Crime News
Crime News: कपड्यांचे माप देऊन घरी परतणाऱ्या नवरदेवावर गोळीबार, साडेसात हजार रुपयांसाठी केली हत्या

मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

तर या घटनेनंतर पत्रकार संदीप महाजन यांनी सांगितले की, गेल्या 5 दिवसांपासून त्यांनी पोलिसांकडे संरक्षण मागितले होते, परंतु पोलिसांनी मला संरक्षण दिलं नाही, माझी किंवा माझ्या परिवाराचं काही बरं वाईट झालं तर त्याला सर्वस्वी आमदार किशोर पाटील, त्यांचे नातेवाईक, मित्रपरिवार असेल असंही महाजन म्हणाले आहेत.(Latest Marathi News)

काय आहे प्रकरण?

जळगाव जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरण समोर आलं. या प्रकरणावरुन पत्रकाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. आमदार किशोर पाटील यांनी टीकेवरुन पत्रकाराला थेट शिवीगाळ केली. यासंदर्भात ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर पत्रकारांनी त्यांना ऑडिओ क्लीपबद्दल प्रश्न विचारला. त्यावर, त्यांनी होय ती ऑडिओ क्लीप माझीच आहे, मीच पत्रकाराला शिवीगाळ केलीय, असा खुलासाही त्यांनी केला. मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे, मी जे केलं ते सांगायला मागे मागे हटणार नाही, असंही ते म्हणाले होते.

Crime News
हरियाणातील गावांत विशिष्ट समुदायास येण्यास मज्जाव; सरपंचांच्या ‘व्हायरल’ पत्राने खळबळ

हे कायद्याचं राज्य आहे का?- संजय राऊत

जळगावच्या पाचोऱ्यात एका पत्रकारावर हल्ला होतो. तो हल्ला शिंदे गटाच्या आमदारांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. त्याचे व्हिडिओ समोर आलेत. तर हे कायद्याचं राज्य आहे का? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांचे लोक अशी मारहाण करत आहेत हे दुर्दैवी असल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत.

रोहित पवारांनी घटनेचा व्हिडिओ ट्विट करत उपस्थित केले प्रश्न

पाचोऱ्यातील पत्रकार संदीप महाजन यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी ट्विट केला आहे. या घटनेवरून रोहित पवारांनी सरकारवर निशाणा साधला आहे. रोहित पवार म्हणाले की, पत्रकाराला फोनवर आई- बहिणी वरून शिवीगाळ करायची, मारण्याची धमकी द्यायची, दुसऱ्या दिवशी त्या पत्रकाराला गुंड पाठवून मारहाण करायची .का ? तर त्याने विरोधात बातमी छापली. विशेष म्हणजे ज्या चौकात मारहाण झाली त्या चौकाला या पत्रकाराच्या स्वातंत्र्यसैनिक वडिलांचे नाव दिलेले आहे. ही घटना बघून स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या डोळ्यात देखील नक्कीच पाणी असेल असं त्यांनी म्हटलं आहे.(Latest Marathi News)

त्याचशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सत्तेची नशा अशी असते का? लोकशाही मूल्यांना, स्वातंत्र्यासाठी झिजलेल्या कुटुंबांना देखील सन्मान नसतो का? हा प्रश्न आज सर्वसामान्य जनता विचारत आहे. सत्ताधाऱ्यांकडून हीच अपेक्षा आहे, परंतु एका पत्रकाराला अशा प्रकारे मारहाण झाली असताना महाराष्ट्राच्या पत्रकारांनी साधा निषेध करण्याची हिंमत देखील केली नाही, हे मात्र नक्कीच अनपेक्षित आहे अशी नाराजीही रोहित पवारांनी व्यक्त केली आहे.

Crime News
Marathi News Live Update: सरदार सिंहची सब-ज्युनिअर संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड, हॉकी इंडियाची घोषणा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.