K. Chandrashekar Rao : तेलंगण पॅटर्नचे मराठी नेत्यांना आव्हान

शेतकरी संघटनेनंतर राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र किसान आघाडीचे नेते शंकरअण्णा धोंडगे यांनी जेव्हा या पक्षात प्रवेश केला तेव्हाच बीआरएसच्या शेतकरी हिताचे मुद्दे केवळ गप्पा नाहीत तर ते तेलंगणात राबवले गेले आहेत.
KCR
KCRsakal
Updated on

K. Chandrashekar Rao - मागील काही महिन्यात भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएसने महाराष्ट्रात जोरदार प्रवेशासाठी सभा, कार्यक्रम सुरू केले आहेत. सुरवातीला मराठवाड्यामध्ये केसीआर यांच्या सभा झाल्या. शेतकऱ्यांचे सरकार ही घोषणा मराठवाड्यात त्यांनी करून आपण केवळ शेतकरी हितासाठी काम करणार, असे उघडपणे जाहीर केले.

बीआरएसचे धोरण हे शेतकरी मुद्द्यावर काम करण्याचे असल्याने अर्थातच शेतकरी संघटनेशी संबंधित किंवा शेतकऱ्यांसाठी संघर्ष करणाऱ्या नेते मंडळींनी उघडपणे बीआरएसची बाजू घेतली. पश्चिम महाराष्ट्रात केसीआर यांनी हीच भूमिका कायम ठेवत असताना विठ्ठल दर्शनाच्या सोहळ्याचा मुहूर्त गाठला.

- प्रकाश सनपूरकर

शेतकरी संघटनेनंतर राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र किसान आघाडीचे नेते शंकरअण्णा धोंडगे यांनी जेव्हा या पक्षात प्रवेश केला तेव्हाच बीआरएसच्या शेतकरी हिताचे मुद्दे केवळ गप्पा नाहीत तर ते तेलंगणात राबवले गेले आहेत. कारण शंकरअम्णा धोंडगे मागील अनेक दशकापासून शेतकरी चळवळीत संघर्ष करत आहेत.

त्यांच्यासारख्या शेतीबद्दल अभ्यास असलेल्या नेत्याला तेलंगणातील शेती विकासाचा आलेला अनुभव समजून घ्यावा लागेल. त्यानंतर किसान सरकारची घोषणा घेऊन पश्चिम महाराष्ट्रात केसीआर नेमके काय करणार अशी उत्सुकता लागलेली होती. पंढरपुरात सर्व महाराष्ट्रातील वारकरी व शेतकऱ्यांचे दैवत श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन त्यांनी एन्ट्री करण्याचे ठरवले. पण ही एंट्री देखील सिंघम स्टाईलची होती.

KCR
Mumbai Rain Update: मुंबईत पावसाचा जोर वाढला, शहर व उपनगरांत साचले पाणी

बहुतांश मंत्री व लोकप्रतिनिधींसह ते गाड्यांचा ताफा घेऊन सोलापुरात दाखल झाले. सभेचा संदेश अचूक पोचावा म्हणून त्यांनी माध्यमांना दाद दिली नाही. त्यानंतर पुष्पवृष्टीचे राजकारण रंगले. सुरवातीला विठ्ठल मंदिरावर पुष्पवृष्टी करण्याचे ठरले.

नंतर पालख्यांवर पुष्पवृष्टी करण्याची परवानगी मागितली. पण परवानगी मिळाली नाही. मात्र तरीही पंढरपुरात त्यांचे स्वागत अगदीच जोरात झाले. त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून स्वागत केले गेले.

नंतर त्यांनी सरकोलीत घेतलेल्या सभेमध्ये महाराष्ट्रातील नेत्यांनी बीआरएसबद्दल केलेल्या वक्तव्यांचा समाचार घेतला. ए टीम व बी टीम याबाबत त्यांनी उघडपणे आम्ही फक्त शेतकऱ्यांची टीम आहोत, असे सांगून विरोधकांना चपराक देण्याचा प्रयत्न केला.

राजकीय टीकेच्या पलिकडे आप पक्षाने ज्या पद्धतीने दिल्लीतील कृती कार्यक्रमावर पक्ष वाढ केली. त्याच पद्धतीने तेलंगण पॅटर्न वर इतर पक्षांना उत्तरे द्यावी लागणार आहे. कृतीकार्यक्रमाच्या आधारे पक्षासमोर आणताना विरोधकांना केवळ शेलकी विशेषणे उपयोगाची ठरणार नाहीत, हे त्यांनी सभेत मांडले.

KCR
Mumbai : पावसाळ्यात मध्य रेल्वेचे देशी जुगाड! हार्बर रेल्वे स्थानकांना बांबूच्या मंडपाचा आधार

राजकीय विचाराच्या पलिकडे जाऊन विकासाच्या मुद्द्यांवर किंवा पॅटर्नवर ते बोलत आहेत. पॅटर्न पध्दतीच्या राजकारणात राजकीय शेलापागोट्यांना काही स्थान नाही, असा सूर केसीआर यांच्या बोलण्यात होता. तसेच आमच्याबद्दल इतर पक्षनेते अस्वस्थ का झाले? असा प्रश्न त्यांनी त्यांच्या पॅटर्नचा मुद्दा किती मजबूत आहे, असेच अप्रत्यक्षपणे सुचवले.

सिंचन विकासाबद्दल बोलायचे तर कालेश्वर लिफ्ट इरिगेशन प्रकल्प या एकाच प्रकल्पाने ४५ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आली. त्याच्या उद्‌‌घाटनाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील होते.

KCR
Mumbai Rain Update: मुंबईत पावसाचा जोर वाढला, शहर व उपनगरांत साचले पाणी

नुकतेच कांद्याचे भाव पडले नंतर दुधाचे भाव उतरले. मात्र तेलंगणात कायमस्वरूपी किमान हमी भाव खरेदी केंद्राची संख्या ७३०० एवढी आहे. शेतीला मोफत वीज व मोफत पाणी कायमचे आहे. सिंचनाचे क्षेत्र झपाट्याने वाढले आहे.

शेतकऱ्याचा जीविताचा विमा, एकाच पासबूकवर शेतीविषयक सेवा, खरीप व रबी पेरणीसाठी एकरी ५ हजार रुपये अनुदान, या सारख्या योजनांनी हा पॅटर्न बनला आहे. या पॅटर्नसाठी त्यांनी नोकरशाही ज्या पद्धतीने हाताळली त्यालाही तोड नाही. या तेलंगण पॅटर्नच्या मुद्द्यापेक्षा राजकीय वाद मोठे ठरतात का? हे काळच ठरवेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.