कालीचरणला जामीन मंजूर; भडकाऊ वक्तव्याप्रकरणी होता अटकेत

Kalicharan Maharaj Arrest
Kalicharan Maharaj Arrestgoogle
Updated on

पुणे: प्रक्षोभक व चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी कालिचरण महाराज याला न्यायालयाने आज 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यावर कालिचरण याने गुरुवारी (ता.६) प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. रामदिन यांच्या न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला.

Kalicharan Maharaj Arrest
संघाचे कार्यालय दहशतवाद्यांच्या रडारवर? 'जैश' कडून रेकी

त्यावर सरकार पक्षातर्फे पोलिस व सहायक सरकारी वकील श्रीधर जावळे यांनी लेखी म्हणणे सादर केले होते. आरोपीचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून, त्याने दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपीला जामीन झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. या प्रकरणातील अन्य आरोपी फरार असून, कालीचरणला जामीन झाल्यास या आरोपींना मदत होईल. त्यामुळे जामीन नाकारण्यात यावा, असे म्हणणे सहायक सरकारी वकील श्रीधर जावळे यांनी सादर केले. त्यावर आज पुन्हा सरकार व बचाव पक्षातर्फे अंतिम युक्तिवाद झाला. कालिचरण याच्यावतीने अॅड. अमोल डांगे यांनी जामीन अर्ज दाखल केला आहे.

समस्त हिंदू आघाडी संघटनेतर्फे १९ डिसेंबर २०२१ रोजी शुक्रवार पेठेतील नातूबाग मैदानावर आयोजित ‘शिवप्रताप दिन अर्थात अफजलखान वधाचा आनंदोत्सव’ कार्यक्रमात दोन समाजात जातीय तेढ निर्माण होईल, असे प्रक्षोभक व चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी कालिचरण याच्यासह पाच जणांवर खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात कालिचरण महाराजाला जयपूरवरून ताब्यात घेण्यात आले होते. न्यायालयाने त्याला बुधवारी एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.