Kalyan News:संतापजनक ! कल्याणमध्ये भररस्त्यात विद्यार्थिनीवर अत्याचाराचा प्रयत्न, पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Kalyan कल्याणमध्ये भररस्त्यात एका विद्यार्थिनीवर अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला आहे. पोलिसांनी तत्परता दाखवतं आरोपीला लगेचं अटक केली.
crime
crimeesakal
Updated on

Kalyan News : क्लासमधून घरी परतणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना कल्याण परिसरात घडली आहे. विशाल गवळी याला कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. विशाल याने मुलीचा पाठलाग करत तिला एका कोपऱ्यात खेचून नेट तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मुलीने हिम्मत दाखवत त्या नराधमाच्या तावडीतून स्वतःची सुटका करून कोळसेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली असता हा प्रकार उघडकीस आला.

बुधवारी सायंकाळी एक अल्पवयीन मुलगी क्लास वरून घरी जात होती. यावेळी विशाल याने तिचा पाठलाग केला. तिला एका कोपऱ्यात खेचत नेऊन तिचे तोंड दाबून तिला खाली पाडले. तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.

विद्यार्थिनीने त्याला प्रतिकार केला आणि त्याच्या तावडीतून ती निसटली. तिने थेट घर गाठत घडलेला प्रकार आई वडिलांना सांगितला. मुलीला घेऊन पालकांनी कोळसेवाडी पोलीस ठाणे गाठततक्रार दाखल केली. दाखल तक्रारीनुसार पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दाखल घेत पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. तातडीने आरोपी विशाल गवळी याचा शोध घेत त्याला अटक केली. (Latest Marathi News)

त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने केलेल्या कृत्याविषयी जरा देखील पश्चाताप न करता दोन बोटे उंचावून विजयाची खून दाखवली. यामुळे पोलिसांनी तात्काळ विशाल ला अटक करत पोलिसी खाक्या दाखवला आहे.

crime
Amit Shah in Pune:मोदींनंतर अमित शाह देखील करणार पुण्याची वारी, चिंचवडमध्ये लावणार कार्यक्रमाला हजेरी

विशाल हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी देखील पोक्सो व बलात्काराचे गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याला तडीपार देखील करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मात्र, कल्याणसारख्या गजबजलेल्या आणि येणाऱ्या-जाणाऱ्यांची वर्दळ असणाऱ्या अशी घडना घडणं, ही अत्यंत संतापजनक घटना आहे. दिवसेंदिवस राज्यातील गुन्हेगारांची हिंमत बळावत चालली आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.(Latest Marathi News)

crime
मुद्द्याचं बोला! कर्जत-जामखेड मतदार संघात MIDCसाठी रोहित पवार आक्रमक, अनोखं जॅकेट घालून वेधलं सगळ्यांचं लक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.