Kalyan Crime:संतापजनक! आधी भररस्त्यात अत्याचाराचा प्रयत्न; आता चाकूनं भोसकून अल्पवयीन मुलीची हत्या

कल्याणमध्ये भररस्त्यात बलात्काराची घटना ताजी असतानाचं आणखी एक गंभीर घटना घडली आहे. कल्याणमध्ये एका अल्पयीन मुलीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे.
Crime News
Crime Newsesakal
Updated on

Kalyan Murder Case:कल्याण पुन्हा एकदा हादरले आहे. एका तरुणाने अल्पवयीन 12 वर्षीय मुलीला सोसायटीच्या आवारातच चाकूने भोसकल्याची घटना घडली आहे. यामध्ये मुलीचा मृत्यू झाला असून मुलाने देखील फिनेल पिल्याने त्याला रुक्मिणी बाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कल्याणच्या तिसगाव परिसरातील ही घटना घडली असून, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

तिसगाव परिसरातील एका सोसायटीच्या आवारात ही घटना घडली. 12 वर्षीय मुलगी आपल्या आईसोबत घरी जात होती. सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या आवारात त्या पोहोचल्या. सोसायटीच्या पायऱ्या चढत असताना आदित्य कांबळे या तरुणाने मुलीवर चाकूने अचानक हल्ला केला.

तरुणाने तिच्यावर सहा ते सात वेळा चाकूने वार केले. यात मुलगी गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. हल्ला करून हल्लेखोर पळून जात असताना नागरिकांनी त्याला पकडलं. याच दरम्यान आदित्य ने स्वतः फिनेल पिल्याचे समजल्याने त्याला रुक्मणीबाई हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले गेले आहे .

Crime News
राज ठाकरेंच्या पाहणीनंतर कार्यकर्त्यांची 'अ‍ॅक्शन' मुंबई-गोवा महामार्गाचे काम पाहणाऱ्या कंपनीचे ऑफिस फोडलं

एकतर्फी प्रेमातून हा हल्ला केला गेला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. चाकूने वार करताना आदित्य आय लव्ह यु बोलत होता. यामुळे एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाल्याचे बोलले जात आहे. या घटनेची कोळसेवाडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी कल्याण पूर्व परिसरात भररस्त्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. दोन विविध ठिकाणी काही तरुणावर कोयत्याने हल्ला करण्यात आला होता. गेल्या दहा दिवसात या घटना घडल्याने कल्याण पूर्व परिसरात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा उडाले आहेत. यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये पोलिसांचा धाक राहिलाय की नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Crime News
Sharad Pawar: 'राष्ट्रीय नेत्यांपेक्षा ईडी जास्त निर्णय घेते', शरद पवारांची भाजपवर टीका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.