Shrikant Shinde Kalyan Loksabha 2024 : कल्याण लोकसभा मतदारसंघात मागच्या काही महिन्यांपासून भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उघड युद्ध सुरु आहे. त्यामुळे भाजप पदाधिकारी लोकसभेला श्रीकांत शिंदेंचं काम करणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. त्यातच आता कल्याण पूर्वेत आमदार गणपत गायकवाड आणि त्यांच्या समर्थकांनी श्रीकांत शिंदेना पाठिंबा दिलेला आहे.
शिवसेनेकडून अद्याप श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आलेली नाही. शनिवारी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदेंच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे त्यांची उमेदवारी निश्चित मानली जातेय. शिवाय भाजप-शिवसेनेतील अंतर्गत वादाची जळमटं कमी होताना दिसून येत आहेत.
भाजप जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी कल्याण पूर्व मतदारसंघात वादावर पडदा पडल्याचं जाहीर केलं आहे. आमदार गणपत गायकवाड आणि त्यांच्या समर्थकांनी श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा जाहीर केल्याचं त्यांनी सांगितलं. कल्याण लोकसभा मतदारसंघ भाजपला मिळवा, अशी भाजप कार्यकर्त्यांची मागणी गैर नव्हती, असंही ते म्हणाले.
भाजप जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी म्हणाले की, भाजप आमदार गणपत गायकवाड समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांची समजूत काढण्यात यश आलेलं असून भाजप व गणपत गायकवाड समर्थकांचा श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा आहे.
गणपत गायकवाड यांच्या कार्यालयात भाजप जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.
काय म्हणाले सूर्यवंशी?
कल्याण लोकसभा मतदारसंघ भाजपला मिळावा, अशी कार्यकर्त्यांची मागणी होती ती गैर नव्हती. मात्र नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवायचं आहे, देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवाराची घोषणा केली आहे, त्या भूमिकेचं स्वागत करणं आमचं काम आहे.
गणपत गायकवाड यांनी भूमिका कार्यकर्त्याना कळवली , मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवायचं आहे, राज्यात 45 चा आकडा पार करायचा आहे, त्यामुळे महायुतीच्या उमेदवार श्रीकांत शिंदे यांना बहुमताने निवडून द्यायचे आहे. गणपत गायकवाड यांच्या भूमिकेचं सर्व कार्यकर्त्यांनी समर्थन केलं असल्याची माहिती सूर्यवंशी यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.