Kapil Dev: कर्जतमध्ये कपिल देवने घेतली जमीन; कारण आहे इन्टरेस्टिंग

Kapil Dev
Kapil Devesakal
Updated on

कर्जतः क्रिकेटपटू कपिल देव यांनी महाराष्ट्रात कर्जतमध्ये जमीन घेतली आहे. यामागचं कारणदेखील इन्टरेस्टिंग आहे. कर्जतला अनेकांनी भूरळ घातलीय. तशीच भूरळ कपिल देव यांनादेखील पडली आहे.

कर्जतच्या कोठिंबे येथील २५ एकर जमीन कपिल देवने खरेदी केली. बुधवारी ते दस्त नोंदणीसाठी दाखल झाले होते. निसर्गरम्य वातावरणात जीवनशैली जगण्याची प्रत्येकाला इच्छा असते. कर्जत परिसरात सध्या अनेक बडे उद्योजक आणि सेलिब्रेटी जमिनी खरेदी करत आहेत.

हेही वाचाः आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

कर्जतच्या निसर्गाची भूरळ पडलेल्या कपिल देव यांनीही कोठिंबे येथे २५ एकर जमीन खरेदी केली. या जमिनीचे दस्त कपिल देव यांच्याकडून नेरळच्या सहनिबंधक कार्यालयामध्ये नोंदविण्यात आले. त्यासाठी ते बुधवारी नेरळ येथे आले होते. त्यांना पाहण्यासाठी कार्यालय परिसरामध्ये मोठी गर्दी झाली होती.

Kapil Dev
Gujarat Elections 2022: चाळीस हजार लोकांची एक गुप्त टीम भाजपसाठी काम करतेय...

सहनिबंधक कार्यालयातील उपनिबंधक महेंद्र भगत यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. कार्यालयातील कर्मचारी, वकील आणि चाहत्यांना यावेळी फोटोचा मोह आवरता आला नाही. यानंतर कसंतरी गर्दीला सावरत कपिल देव निघून गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.