करंजा बंदरात खारफुटीची बेसुमार कत्तल; न्यायालय, हरित लवादाकडे दाद मागणार

mangrove
mangrove sakal media
Updated on

उरण : बंदरालगत (Karanja Port) असलेल्‍या खारफुटीची (Mangroves) करंजा टर्मिनल लॉजिस्टिक कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर कत्तल होत आहे. शिवाय तोडलेली झाडे (cutting trees) करंजा - खोपटा खाडीत (Karanja-khopta creek) बेकायदेशीररीत्या (illegal) टाकली जात आहेत. याप्रकरणी उरण सामाजिक संस्थेने न्यायालयात (court) आणि हरित लवादाकडे (Green tribunal) दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.

mangrove
पालिकेकडून कांदिवलीत कागदी घोडे; आमदार अतुल भातखळकर संतप्त

उरण सामाजिक संस्‍थेच्या तक्रारीनंतर तहसीलदारांच्या आदेशानुसार, बंदरालगतच्या परिसराची पाहणी करण्यात आली. यावेळी बंदराच्या पूर्वेला तोडलेल्या खारफुटींचे सात मोठे ढिगारे समुद्रात टाकल्‍याचे आढळले. जवळपास सुमारे १०० मीटर लांब आणि १५ फूट रुंदीच्या भागातील खारफुटीची कत्तल करून कोणाच्याही लक्षात येऊ नये म्‍हणून जेसीबी किंवा तत्सम यंत्राच्या साहाय्याने तो भाग पूर्ण खोदल्‍याचे दिसून आले. परंतु त्याच भागाला लागून असलेल्या दक्षिणेकडील बाजूस सुमारे १०० खारफुटीची झाडे टाकल्‍याचे आढळले.

तोडलेली झाडे टगच्या सहाय्याने समुद्रात फेकण्यात येत असल्‍याने मच्छीमारांचे नुकसान होत असल्‍याचे यावेळी संस्‍थेच्या अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. याशिवाय बंदरात साठवलेल्या कोळशाच्या ढिगाऱ्यातून काळे पाणी झिरपून समुद्रात जात असल्‍याचे आढळले.
काही दिवसांपूर्वी एक टग खारफुटीच्या झाडांची मोट पाठीमागे बांधून समुद्रातून जात असल्याचे छायाचित्र आणि व्हिडिओ उरणच्या तहसीलदारांना दाखवला. मात्र त्‍यानंतरही योग्‍य उपाययोजना करण्यात न आल्‍याने संस्थेने करंजा टर्मिनल विरोधात लेखी तक्रार केली आहे.

mangrove
राज्यात ४० टक्‍के महिलांना स्‍तन कर्करोगाचा उच्‍च धोका

मच्छीमारांकडून तक्रार

रायगड जिल्‍हाधिकारी कार्यालयात माहितीच्या अधिकाराखाली अर्ज केला असता, करंजा टर्मिनल लॉजिस्टिक कंपनीला खारफुटीची झाडे तोडण्याची परवानगी दिली नसल्‍याचे सांगण्यात आले. करंजा-खोपटा खाडीतील मच्छीमारांनी उरण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून कंपनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी हरित लवादाकडे, तसेच न्यायालयात दाद मागणार असल्‍याची माहिती संस्‍थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील यांनी दिली.

महसूल, वनविभाग, पोलिस, बंदर खाते इ. विभागांची कार्यालये केवळ चार-पाच किमी अंतरावर असताना कंपनीकडून दिवसाढवळ्या खारफुटीची बिनधास्‍त कत्‌तल केली जात आहे. त्यामुळे पर्यावरणाची हानी आणि मच्छीमारांचे मोठे नुकसान होत असल्‍याने कंपनीविरोधात कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.