Balasaheb Thorat : महाराष्ट्राचे CM गुवाहाटीऐवजी दिल्लीत जाऊन बसले तर जनतेला आधार वाटेल; थोरातांची शिंदेंवर टीका

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून राजकारण पेटलं आहे.
Maharashtra-Karnataka Border Dispute
Maharashtra-Karnataka Border Disputeesakal
Updated on
Summary

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून राजकारण पेटलं आहे.

Maharashtra-Karnataka Border Dispute : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून राजकारण पेटलं आहे. सोलापूर आणि अक्कलकोट शहरं तसंच जत तालुक्यातील 40 गावं कर्नाटकचाच भाग असल्याचं वक्तव्य कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी केलं.

मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानं आधीच पेटलेल्या वादात तेल ओतण्याचं काम केलं आहे. त्यात कर्नाटकातील हिरेबागेवाडी इथं महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला झाला. त्यानंतर दोन्ही राज्यांच्या सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर जोरदार टीका केलीय.

Maharashtra-Karnataka Border Dispute
Telangana Police : आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची बहीण शर्मिला रेड्डींना अटक; पोलिसांची मोठी कारवाई

सीमाप्रश्न असतो तेव्हा सर्व पक्ष एकत्र येतात. मराठी माणसाच्या पाठीशी उभे राहतात. म्हणून मी मुख्यमंत्र्यांना सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची विनंती केली होती. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळं द्वेष वाढत आहे. मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका ठोस ठेवली पाहिजे. ती भूमिका आम्हाला सांगितली पाहिजे. सर्वोच्च न्यायालयात चांगली बाजू मांडण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजे, असं थोरात यांनी सांगितलं.

Maharashtra-Karnataka Border Dispute
Narendra Modi : इंडोनेशियानंतर PM मोदींनी नागपुरात वाजवला ढोल; सगळे बघतच राहिले, पाहा अफलातून Video

कर्नाटकचे मुख्यमंत्री दिल्लीत जाऊन बसतात. मात्र, तसं महाराष्ट्रात होताना दिसत नाही. त्यामुळं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गुवाहाटीऐवजी (Guwahati) दिल्लीत जाऊन बसले तर जनतेला आधार वाटेल, अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर केली आहे. आपली तयारी चांगली असली पाहिजे. त्यासाठी हरीश साळवे यांना त्यामध्ये घ्यावं, असा आग्रह आम्ही धरला आहे. भारत जोडो हे राष्ट्रीय कार्य आहे. राज्यघटना आणि संविधान वाचविण्यासाठी काँग्रेससह सर्व पक्षांचे लोकं एकत्र आले. महाविकास आघाडीतील 10 ते 12 आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला जातो. यावर बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, या दाव्याला काही अर्थ नाही. महाविकास आघाडी भक्कम आहे, असं त्यांनी स्पष्ट उत्तर दिलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.