Dhairyasheel Mane : "अतिरेकी आहे का" ; बेळगाव प्रवेश बंदीवर धैर्यशील माने संतापले

Dhairyasheel Mane
Dhairyasheel Mane
Updated on

Dhairyasheel Mane : शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांना बेळगावमध्ये प्रवेश बंदी करण्यात आली आहे. बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी तशे पोलिसांना आदेश दिले आहे. तसेच पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आला आहे. धैर्यशील माने हे बेळगावला जाणार होते. त्यांनी तशी घोषणा देखील केली होती. मात्र त्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. यावर धैर्यशील माने यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Dhairyasheel Mane banned from entering Belgaum)

धैर्यशील माने म्हणाले, "एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी मला आमंत्रित केले होते. परवानगी मागितल्यानंतर देखील जिल्हाधिकाऱ्यांनी रात्री बंदीचे आदेश काढले. मागच्या वेळी देखील अशाच पद्धतीचे आदेश निघाले होतो. महाराष्ट्र-कर्नाटक वाद वैचारीक आणि भौगोलिक, असा वाद आहे. "

हेही वाचा - भारतीयांनी जगाला डिजिटल पेमेंट शिकवायची आलीये वेळ...

भाषेच्या पद्धतीवर आधारीत अशा प्रकारचा वाद आहे. या राष्ट्राला दुभंगता यावी, अशा पद्धतीने पाहणे अत्यंत चुकीचे आहे. कर्नाटक सरकार हूकूमशाही आणि दडपशाही पद्धतीचे राजकारण करत आहे. तसेच सीमावासीयांवर दबाव टाकत आहे," असे धैर्यशील माने म्हणाले.

Dhairyasheel Mane
Jammu Kashmir : काश्मीर खोऱ्यात सैन्याला मोठं यश; चकमकीत दोन दहशतवादी ठार

धैर्यशील माने म्हणाले, "दोन्ही राज्यांचे अधिकारी असलेली समन्वय समीती आहे. ही समिती काय करत आहे. दोन्ही राज्यांकडून ही समिती असले. तर त्यामध्ये चांगली चर्चा असेल. तर एखादा लोकप्रतिनिधी पलीकडच्या राज्यात जातोय तर अतिरेकी आल्यासारखे तुम्ही फौजफाटा लावला, नेमकं तुमचं कारण काय, हा दडपशाहीचा भाग आहे. मी हे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणणार आहे."

Dhairyasheel Mane
Graduate Constituency Election : महाविकास आघाडीत दोन्ही काँग्रेसकडून शिवसेनेची कोंडी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.