Police Action Video : कपडे घेऊन पोलिस पसार; धबधब्याखाली आंघोळ करणाऱ्यांना शिकवला चांगलाच धडा

प्रतिबंधित असतानाही पर्यटक धबधब्याजवळ पोहोचले आणि आंघोळ करु लागले. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस तेथे पोहोचले आणि लोकांचे कपडे घेऊन निघून गेले. पोलिस काही अंतर जात नाहीत तोच आंघोळ करणाऱ्या तरुणांनी पोलिसांच्या मागे-मागे जात कपडे माघारी देण्यासाठी विनवणी करु लागले.
Police Action Video : कपडे घेऊन पोलिस पसार; धबधब्याखाली आंघोळ करणाऱ्यांना शिकवला चांगलाच धडा
Updated on

Karnataka Police Viral Video : डोंगरकपाऱ्यातून येणाऱ्या पाण्याखाली अनेकजण आंघोळ करत असतात. परंतु या पाण्याच्या वेगाचा अंदाज कुणाला लागत नाही. त्यामुळे अनेकांचा जीव जाण्याची शक्यता आहे. कर्नाटकात एका धबधब्याखाली आंघोळ करणाऱ्या तरुणांची खोड पोलिसांनी मोडली. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

धबधब्याखाली आंघोळ करणाऱ्या तरुणांचे कपडे घेऊन पोलिस निघून जातात, तेव्हा त्या तरुणांची काय तारांबळ उडते, हे या व्हिडीओमध्ये दिसून येतंय. पोलिसांनी त्या तरुणांचे कपडे नेऊन गाडीत टाकले. त्यानंतर ते तरुण कपडे शोधत पोलिसांच्या मागे आले आणि गयावया करु लागले.

Police Action Video : कपडे घेऊन पोलिस पसार; धबधब्याखाली आंघोळ करणाऱ्यांना शिकवला चांगलाच धडा
Olympic 2024: सुरु होतोय ऑलिम्पिकचा थरार! कुठे आणि केव्हा पाहाणार सामने? घ्या जाणून

हे प्रकरण कर्नाटकातल्या चिकमगलूर ओलेखन धबधबा चारमाडी येथील आहे. चिकमगलुरु येथे मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. येथील धबधबा पर्यटकांचं आकर्षण आहे. मुदिगेरे भागातल्या कोटिगे हारा ते चारमाडी घाट रस्त्यावर अनेक मनमोहक धबधबे आहेत. इथल्या काही धबधब्यांजवळ जाण्यासाठी प्रशासनाने मज्जाव केलेला आहे.

प्रतिबंधित असतानाही पर्यटक धबधब्याजवळ पोहोचले आणि आंघोळ करु लागले. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस तेथे पोहोचले आणि लोकांचे कपडे घेऊन निघून गेले. पोलिस काही अंतर जात नाहीत तोच आंघोळ करणाऱ्या तरुणांनी पोलिसांच्या मागे-मागे जात कपडे माघारी देण्यासाठी विनवणी करु लागले.

Police Action Video : कपडे घेऊन पोलिस पसार; धबधब्याखाली आंघोळ करणाऱ्यांना शिकवला चांगलाच धडा
Amravati Rain Updates : अमरावतीत पाऊस थांबेना! अंबा नाल्यात चौदा वर्षीय मुलगा वाहून गेला; शेकडो हेक्टरवरील पिके पाण्याखाली

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलिसांनी त्या तरुणांवर कुठलीही कठोर कारवाई केली नाही. त्यांचे कपडे माघारी देऊन त्यांना इशारा दिला. तरुणांनीही इथून पुढे असा आगाऊपणा करणार नसल्याचा शब्द दिला. हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.