पावसाचा जोर वाढला! कर्नाटकच्या आलमट्टीत 44 टीएमसी तर महाराष्ट्राच्या कोयना धरणात किती साठा?

पावसाचा जोर वाढल्यामुळं आलमट्टी धरणातील (Almatti Dam) पाण्याचा साठा वाढला आहे.
Almatti Dam Koyna Dam
Almatti Dam Koyna Dam esakal
Updated on
Summary

आलमट्टी धरणामुळेच २००५ साली कृष्णा नदीला (Krishna River) महापूर आल्याचा ठपका महाराष्ट्राकडून ठेवण्यात आला होता.

बेळगाव : पावसाचा जोर वाढल्यामुळं आलमट्टी धरणातील (Almatti Dam) पाण्याचा साठा वाढला आहे. कर्नाटक पाटबंधारे खात्याने (Karnataka Irrigation Department) दिलेल्या माहितीनुसार, २२ जुलै रोजी आलमट्टी धरणातील एकूण पाणीसाठा ४४.४९५ टीएमसी तर जिवंत पाणीसाठा २६.८७५ टीएमसी इतका झाला आहे.

पण, गतवर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा खूपच कमी आहे. गतवर्षी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून जोरदार पाऊस सुरू झाला होता. आलमट्टी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला होता. त्यामुळे धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढली होती.

Almatti Dam Koyna Dam
Sindhudurg Flood : येत्या दोन दिवसांत मुसळधार; जिल्हाधिकाऱ्यांनी सिंधुदुर्गवासियांना केलं 'अलर्ट', पूरस्थितीची शक्यता!

परिणामी, गतवर्षी २२ जुलै रोजी धरणातील एकूण पाणीसाठा ९६.८६१ टीएमसी तर जिवंत पाणीसाठा ७९. २४१ टीएमसी इतका होता. आलमट्टी धरणाची पाणी साठविण्याची क्षमता १२३.०८ टीएमसी इतकी आहे. कृष्णा नदीवर बांधण्यात आलेल्या या धरणाची चर्चा २००५ सालापासून सातत्याने होते.

आलमट्टी धरणामुळेच २००५ साली कृष्णा नदीला (Krishna River) महापूर आल्याचा ठपका महाराष्ट्राकडून ठेवण्यात आला होता. २०१९ साली त्याची पुनरावृत्ती झाली होती. त्यानंतर मात्र आलमट्टी धरणातील पाणीसाठा, पाण्याचा विसर्ग याकडे महाराष्ट्राकडून लक्ष ठेवले जाते. यंदा जून महिना कोरडा गेल्यामुळे आलमट्टीतील पाणीसाठा कमी झाला होता.

Almatti Dam Koyna Dam
Kolhapur Rain : पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीवर! 75 बंधारे पाण्याखाली; जाणून घ्या कोणते मार्ग सुरु, कोणते बंद

शिवाय पाणीटंचाईची आहे. शक्यताही वर्तविली जात होती; पण १७ जुलैपासून जोरदार पाऊस सुरू झाला. आलमट्टीच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे आलमट्टीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. २२ जुलै रोजीच्या आकडेवारीनुसार पाण्याची आवक (इनफ्लो) ८३ हजार ९४५ क्युसेक इतकी आहे.

गतवर्षी २२ जुलै रोजीही आलमट्टीतील पाण्याची आवक एवढीच म्हणजे ८३ हजार ४६० क्युसेक इतकी होती. गतवर्षी २२ जुलै रोजी आलमट्टीतून विसर्ग वाढविला होता, त्यावेळी तब्बल ६४ हजार २०१ क्युसेक इतका विसर्ग होता. यंदा मात्र जलाशयातून केवळ ३ हजार ५७६ क्युसेक इतक्याच पाण्याचा विसर्ग होत आहे. गतवर्षी २२ जुलै रोजी धरण ७८.६९ टक्के भरले होते.

यंदा २२ जुलै रोजी ३६.१५ टक्के इतके भरले आहे. बेळगाव जिल्ह्यातील हिडकल जलाशय ३०.०८ टक्के इतके भरले. त्याची पुनरावृत्ती झाली होती. त्यानंतर मात्र आलमट्टी धरणातील पाणीसाठा, पाण्याचा विसर्ग याकडे महाराष्ट्राकडून लक्ष ठेवले जाते. यंदा जून महिना कोरडा गेल्यामुळे आलमट्टीतील पाणीसाठा कमी झाला होता. शिवाय पाणीटंचाईची आहे. शक्यताही वर्तविली जात होती; पण १७ जुलैपासून जोरदार पाऊस सुरू झाला.

आलमट्टीच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे आलमट्टीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. तर, हिडकल जलाशयाची क्षमता ५१ टीएमसी असून यंदा २२ जुलै रोजी जलाशयात १५.३४४ टीएमसी पाणीसाठा आहे. गतवर्षी २२ जुलै रोजी जलाशयात ३४.२३५ टीएमसी पाणीसाठा होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सर्वच जलाशयांमधील पाणीसाठा कमी आहे; पण पावसाचा जोर कायम राहिला, तर धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होणार आहे.

Almatti Dam Koyna Dam
Satara Rain : धोका वाढतोय! दरडीच्या छायेतील 489 कुटुंबांचं स्‍थलांतर; 'या' तालुक्‍यांतील गावांचा समावेश

आलमट्टीतून अजून विसर्ग नाही

महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला की आलमट्टी व हिडकल या दोन धरणातील पाणीसाठ्यात वाढ होते; पण महाराष्ट्रातील कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला की, आलमट्टी धरणातूनही विसर्ग सुरू करण्याची मागणी केली जाते; पण यंदा अद्याप तशी स्थिती उद्भवलेली नाही.

कोयनेत संततधार सुरूच

पाटण : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात शुक्रवारच्या तुलनेत पावसाचा जोर वाढला आहे. पावसाचा जोर वाढल्याने धरण पाणलोट क्षेत्रात सरासरी दीडशे मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जलाशयाचा एकूण पाणीसाठा ४४.१४ टीएमसी झाला असून, रात्रीपासून धरण पाणलोट क्षेत्रासह तालुक्यात संततधार पाऊस पडत आहे. गेली दोन दिवस पावसाचा जोर कमी झाला होता. धरण पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू होती. मात्र, पूर्व भागात शुक्रवारी पावसाने उघडीप घेतली होती.

Almatti Dam Koyna Dam
Chiplun Rain : इर्शाळवाडीत दरड कोसळली अन् हादरली कोळकेवाडी; डोंगराला पडल्या भेगा, कुटुंबं संकटात

रात्रीपासून पुन्हा संततधार पाऊस सुरू झाला तो आज दिवसभर चालू होता. गेल्या २४ तासांत कोयनानगर येथे १४४ मिलिमीटर, नवजाला १६४ मिलिमीटर आणि महाबळेश्वरला १५१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जलाशयाच्या पाणीसाठ्यात अडीच टीएमसी पाण्याची भर पडली असून, एकूण पाणीसाठा ४४.१४ टीएमसी झाला आहे. जलाशयात प्रतिसेकंद २९ हजार ३३८ क्युसेक पाण्याची आवक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.