Video : लोकशाहीवरील यशस्वी भाषणानंतर 'भोऱ्या'चं आंबेडकरांवरील भाषण व्हायरल

त्याचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
Video
Video Sakal
Updated on

"लोकशाही असल्यामुळे मी खेळतो, मोक्कार धिंगाणा करतो, माकडासारखा झाडावर चढतो तर लोकशाही असल्यामुळे मला माझे वडील काहीच बोलत नाहीत. पण जसं लोकशाहीला पायदळी तुडवतात तसंच सर देखील मला पायदळी तुडवतात." या भाषणामुळे महाराष्ट्रभर प्रसिद्ध झालेल्या भोऱ्या उर्फ कार्तिक वजीरचा आंबेडकर जयंतीचा व्हिडिओ पुन्हा व्हायरल झाला आहे.

"भारतरत्न, जगप्रसिद्ध वकील असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांचे आयुष्य बदलून टाकले. सर्वांत प्रभावशाली व्यक्तीमध्ये त्यांची गणना होते. बाबासाहेबांनी आम्हाला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मोलाचा संदेश दिला. गुलामाला गुलामीची जाणीव करून दिल्याशिवाय तो पेटून उठणार नाही असंही आंबेडकर म्हणाले होते." अशा शब्दांत त्याने भाषण केले आहे. या आधी लोकशाहीवरील त्याचे भाषण चांगलेच व्हायरल झाले होते.

Video
Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

कार्तिक वजीर असं या चिमुकल्याचं नाव असून तो जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील रेवलगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत आहे. या शाळेतील तो इयत्ता पहिलीचा विद्यार्थी असून त्याचे वडील शेतकरी आहेत. त्याच्या घरची परिस्थितीही बिकट असून तो लहानपणापासून खोडकर असल्याचं त्याच्या वर्गशिक्षकाने सांगितलं आहे.

त्याला रातांधळेपणा हा आजार असल्यामुळे त्याला दिसायला कमी आहे. त्यामुळे तो वर्गात फळ्याच्या जवळ बसतो. तर तो दिसायला गोरा असल्यामुळे त्याला सर्वजण भुऱ्या या नावाने चिडवतात. लोकशाहीच्या भाषणामुळे प्रसिद्ध झालेल्या भुऱ्याचा आंबेडकर जयंतीचासुद्दा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.