Kartiki Ekadashi : पंढरपुरात कार्तिकीची महापूजा अजित पवारांच्या हस्ते होणार? मराठा क्रांती मोर्चाचा दादांना तीव्र विरोध

पोलिसांनीही महापूजेसाठी उपमुख्यमंत्र्यांनी, यावे यासाठी सकारात्मकता दर्शविल्याची माहिती आहे.
Kartiki Ekadashi Kartiki Mahapuja Ajit Pawar Devendra Fadnavis
Kartiki Ekadashi Kartiki Mahapuja Ajit Pawar Devendra Fadnavisesakal
Updated on
Summary

कार्तिकी एकादशीची विठ्ठलाची शासकीय महापूजा मराठा आरक्षण आंदोलनाचे चेहरा बनलेले मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते सपत्नीक करावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे.

पंढरपूर : कार्तिकी महापूजेला (Kartiki Mahapuja) दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपैकी कोणाला बोलवायचे, असा प्रश्न मंदिर समितीसमोर उभा आहे. अशातच कार्तिकी एकादशीची (Kartiki Ekadashi) विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते होणार आहे, अशी जोरदार चर्चा सुरू आहे.

पोलिसांनीही महापूजेसाठी उपमुख्यमंत्र्यांनी, यावे यासाठी सकारात्मकता दर्शविल्याची माहिती आहे. राज्याला प्रथमच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार यांच्या रूपाने दोन उपमुख्यमंत्री मिळाले आहेत. त्यामुळे यंदाच्या कार्तिकी महापूजेसाठी कोणाला निमंत्रण द्यायचे, याचा मंदिर समितीपुढे अजूनही पेच कायम आहे.

Kartiki Ekadashi Kartiki Mahapuja Ajit Pawar Devendra Fadnavis
Maratha Reservation : मला खासदार करा, मी मराठा-धनगर आरक्षणाचा प्रश्‍न दहा मिनिटांत सोडवतो : महादेव जानकर

हा पेच सोडविण्यासाठी मंदिर समितीने विधी व न्याय खात्याकडे पत्र पाठवून अभिप्राय मागितला आहे. परंतु त्यावरील अभिप्राय अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे महापूजेचा गोंधळ कायम आहे. दरम्यान, मराठा आंदोलकांनी उपमुख्यमंत्र्यांना महापूजेसाठी विरोध केला असला तरी उपमुख्यमंत्री अजित पवार पंढरपूरला महापूजेसाठी येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

त्यामुळे कार्तिकी महापूजेचा पेच लवकरच सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उपमुख्यमंत्र्यांनी महापूजेसाठी पंढरपूरला यावे यासाठी वारकऱ्यांबरोबरच पोलिस विभाग देखील सकारात्मक असल्याची माहिती देण्यात आली.

Kartiki Ekadashi Kartiki Mahapuja Ajit Pawar Devendra Fadnavis
Maratha Reservation : उदयनराजेंच्या साताऱ्यात आढळले तब्बल 20 हजार 'कुणबी'; शंभूराज देसाईंच्या पाटणमध्ये सर्वाधिक नोंदी!

चार वर्षानंतर जनावरांचा बाजार

कोरोना आणि त्यानंतर जनावरांमध्ये आलेल्या लंपी आजाराच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार वर्षापासून बंद असलेला कार्तिकीचा खिलार जनावरांचा बाजार यंदापासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी बाजार सुरू होणार असल्याची माहिती दिली.

जरांगे यांच्या हस्ते महापूजेची मागणी

कार्तिकी एकादशीची विठ्ठलाची शासकीय महापूजा मराठा आरक्षण आंदोलनाचे चेहरा बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते सपत्नीक करावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी केली आहे. ‘‘मराठा समाजावर प्रेम असेल तर मनोज जरांगे पाटील व त्यांच्या कुटुंबीयांना बोलावून त्यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा करावी.

Kartiki Ekadashi Kartiki Mahapuja Ajit Pawar Devendra Fadnavis
डी. के. शिवकुमारांनंतर खासदार सुरेश यांनी घेतली जारकीहोळींची भेट; कर्नाटकच्या राजकारणात मोठ्या भूकंपाची शक्यता?

त्यानंतरही महापूजेसाठी येणार असाल तर मराठा समाज काय आहे, तुम्हाला माहिती आहे. बीड व जालना जिल्ह्यातील आमदारांचे काय काय झाले आहे, तुम्ही पाहिले असेल. तुम्हाला डेंगी झाला आहे. त्यामुळे पंढरपूरला येण्याचे धाडस करू नका. आरक्षण मिळत नाही तोपर्यंत पंढरपूरच काय राज्यात कुठेही फिरू देणार नाही, असा इशारा गायकवाड यांनी अजित पवार यांना उद्देशून दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.