Kartiki Ekadashi Yatra : कार्तिकी यात्रेसाठी एसटी महामंडळाच्या वतीने २ हजार ७०० बस गाड्यांचे नियोजन

कार्तिकी एकादशी यात्रेला येणाऱ्या भाविकांसाठी एस. टी. महामंडळाच्या वतीने यंदा तब्बल २ हजार ७०० यात्रा स्पेशल बस गाड्यांचे नियोजन केले आहे.
ST Mahamandal
ST Mahamandalsakal
Updated on

पंढरपूर - कार्तिकी एकादशी यात्रेला येणाऱ्या भाविकांसाठी एस. टी. महामंडळाच्या वतीने यंदा तब्बल २ हजार ७०० यात्रा स्पेशल बस गाड्यांचे नियोजन केले आहे. या बस गाड्या मधून हजारो भाविक पंढरीत दाखल होऊ लागले आहेत.

पंढरीतील भव्य अशा नवीन चंद्रभागा बस स्थानकातून २२ ते २४ नोव्हेंबर या कालावधी मध्ये राज्यभरातून बस गाड्यांची वाहतूक होणार असून जास्तीत जास्त भाविकांनी या जादा बससेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन एस टी महामंडळाने केले आहे.

कार्तिकी यात्रेला विदर्भ, मराठवाडा येथील भाविकांपेक्षा कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे या जिल्ह्यातील भाविकांची जास्त गर्दी होते. दरवर्षी कार्तिकी यात्रेनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनाला जाणाऱ्या कोकणासह उर्वरित महाराष्ट्रातील भाविक प्रवाशांसाठी एसटी महामंडळाच्या वतीने यात्रा स्पेशल जादा बस गाड्यांचे नियोजन केले जाते.

यंदादेखील एसटी महामंडळाने २ हजार ७०० बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. मागील आषाढी यात्रेपूर्वी या यात्रा स्पेशल बस गाड्यांची वाहतूक नवीन बस स्थानकातून होत होती. मात्र आषाढी यात्रेपासून नव्याने बांधण्यात आलेल्या चंद्रभागा बस स्थानकाचा यात्रा कालावधीमध्ये वापर करण्यात येत आहे.

यावर्षी कार्तिकी यात्रेसाठी देखील राज्यातील सर्वात मोठे बस स्थानक असलेल्या चंद्रभागा बस स्थानकातून बस गाड्यांची वाहतूक सुरू आहे. या बसस्थानकामध्ये तब्बल ३६ फलाट आहेत. कार्तिकी यात्रेला येणाऱ्या भाविकांसाठी या बस स्थानकामध्ये सतरा विभाग पाडण्यात आले आहेत.

चंद्रभागा बस स्थानकामध्ये महामंडळाने भाविक प्रवाशांच्यासाठी थंड पाणी, स्वच्छतागृहे, उपहार, आपला दवाखाना, ॲम्बुलन्स आधी सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. याशिवाय ५० पर्यवेक्षक कर्मचारी, सोलापूर सह इतर विभागातील अधिकारी, मार्ग तपासणी पथक व एसटी बिघाड दुरुस्ती वाहन सज्ज ठेवण्यात आले आहे.

कार्तिकी एकादशी यात्रेसाठी राज्यभरातून हजारो भाविक प्रवासी येथील चंद्रभागा बस स्थानकामध्ये दाखल होत आहेत. एकादशीनंतर भाविकांना परतीच्या प्रवासाला जाताना होणारी गर्दी टाळण्यासाठी संपूर्ण बसचे ऍडव्हान्स बुकिंग देखील सुरू करण्यात आले आहे. तरी भाविक प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा.

- मोहन वाकळे, बस आगार प्रमुख, पंढरपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.