संगमनेर: करूणा मुंडे (karuna munde) यांनी प्रेमकथेवर पुस्तक लिहिणार असल्याचं जाहीर केलं आहे. तेव्हापासून राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागलीय. नेमकं त्या पुस्तकात काय असेल, याचा अंदाज जो तो बांधू लागलाय. (Karuna Dhananjay Munde's book on love story in controversy)
करूणा या सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहेत. मंत्री मुंडे यांनीच तशी सोशल मीडियातून कबुली दिली होती. त्यावरून महाराष्ट्रात राजकीय धुराळा उडाला. तो खाली बसला असतानाच आता करूणा यांनी आपली प्रेमकथा (love story) पुस्तकरूपात आणण्याचा संकल्प केलाय. ती प्रेमकथा शब्दबद्ध होण्यापूर्वीच वादात सापडलीय.
मुंडे यांनी आपल्या आगामी पुस्तकाची फेसबुक (facebook) या समाजमाध्यमावरून जाहिरात करताना, ख्रिस्ती धर्मियांच्या पवित्र बायबल ग्रंथाच्या मुखपृष्ठावर प्रेम (love) शब्द टाकला आहे. यामुळे समस्त ख्रिश्चन धर्मियांच्या भावना दुखावल्याची तक्रार महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल भोसले यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
करूणा धनंजय मुंडे यांनी आपल्या फेसबुक वॉलवरून 'एक प्रेम कथा' या आगामी पुस्तकाची जाहिरात केली आहे. त्यातील डिझाईनमध्ये बायबल धर्मग्रंथाचे छायाचित्र वापरले आहे. मात्र, त्यावर प्रेम असा शब्द लिहिला आहे. यामुळे ख्रिस्ती धर्मियांच्या भावना दुखावल्या असून समाजात संतापाची लाट उसळली आहे. प्रत्येक वेळी ख्रिश्चन धर्माला वेगवेगळ्या पद्धतीने लक्ष्य केले जात आहे. या बाबत आता समाजमन जागृत झाले आहे. या फेसबुकवरील जाहिरातीची पोस्ट तत्काळ रद्द करुन, संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. (Karuna Dhananjay Munde's book on love story in controversy)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.