Nilesh Rane l धनंजय मुंडेंना स्वतःची IPL टीम बनवायचीयं; निलेश राणे

धनंजय मुंडे यांच्या वयक्तिक आयुष्याविषयी चर्चेला उधान आले आहे.
nilesh rane ,dhananjay munde
nilesh rane ,dhananjay mundeesakal
Updated on

करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे (Dhanajay Munde) यांच्याविरोधात वक्तव्य केलं. यामुळे राष्ट्रवादीचे नेते आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या वयक्तिक आयुष्याविषयी चर्चेला उधान आले आहे. यावर आता भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी ट्विट करत टोला हाणला. धनंजय मुंडेला स्वतःची IPL टीम बनवायची आहे वाटतं. हिंदूचे कायदे धनंजय मुंडे ला लागू होत नाही का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

Summary

राष्ट्रवादीचे नेते आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या वयक्तिक आयुष्याविषयी चर्चेला उधान आले आहे.

nilesh rane ,dhananjay munde
विजयी झाल्यास कोणतीही मालमत्ता खरेदी करणार नाही- करुणा शर्मा

करुणा शर्मा (Karuna Sharma) या आज कोल्हापुरात उत्तर विधानसभा निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्यास आल्या होत्या. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीकास्त्र सोडले. धनंजय मुंडे यांनी स्वत:ची ६ मुले आणि अनेक बायका लपवल्या आहेत असा आरोप केला. यावर आता राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.

nilesh rane ,dhananjay munde
उध्दव ठाकरे म्हणाले, नारायण राणे तुम्ही कधीही काॅल करा पण...

दरम्यान, निलेश राणे यांनी ट्विट करत म्हटलयं की, धनंजय मुंडे ला स्वतःची IPL टीम बनवायची आहे वाटतं. हिंदूचे कायदे धनंजय मुंडे ला लागू होत नाही का? ह्याची आमदारकी पण रद्द होते कारण याने निवडणुक आयोगाला खोटी माहिती दिली, त्यांनी स्वतः मान्य केले आहे. याला जंगलात पाठवा, पिसळलाय अशी शब्दात त्यांनी प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाल्या करूणा शर्मा

करूणा शर्मा यांनी याआधीही धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले होते. लवकरच धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्यावर लवकरच चित्रपट येणार आहे अशी माहिती दिली. त्यानंतर आज मुंडेनी मुले आणि बायका लपवल्याचा आरोप केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना धनंजय मुंडे म्हणाले, करुणा शर्मा यांना पिक्चर काढायचा असेल तर त्यांनी प्रोड्यूसरकडे जावं, असं माध्यमांकडे जाऊन काहीही उपयोग होणार नाही असेही मुंडे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.