पुणे : राज्यातील रिक्त झालेल्या विधानसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे पुण्याच्या माजी महापौर आणि भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोट निवडणूक होणार आहे. दरम्यान कसबा पेठ पोटनिवडणूक काँग्रेस लढणार असल्याची माहिती समोर आली आहे.
काँग्रेससह राष्ट्रवादी, शिवसेनाही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. तर इतर पक्षांनी या निवडणुकीसाठी कंबर कसून तयारी सुरू केली आहे. तर कसबा पोटनिवडणूकीच्या तोंडावर पुण्यातील काँग्रेसचे पदाधिकारी आणि नेते मात्र श्रीनगरमध्ये पोहचले आहेत. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेसाठी पुण्यातील काँग्रेसची फौज श्रीनगरमध्ये दाखल झाली आहे.
कसबा पोटनिवडुकसाठी काँग्रेसचे निरीक्षक आमदार संग्राम थोपटे हे देखील भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत. पुणे काँग्रेस शहराध्यक्षसह इच्छुक उमेदवारही श्रीनगरमध्ये दाखल झाले आहेत. एकीकडे भाजपने कसबा पोटनिवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली असताना काँग्रेसमध्ये मात्र शुकशुकाट दिसून येत आहे. उमेदवारीसाठी इच्छुक उमेदवार, काँग्रेसचे नेते श्रीनगरला गेल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. तर काँग्रेस भवनात इच्छुक उमेदवाराचे अर्ज आले आहेत. भाजप पाठोपाठ कसबा विधानसभा हा काँग्रेससाठी परंपरा असलेला मतदारसंघ मानला जातो.
मुक्ता टिळक यांच्यानिधनानंतर आज निवडणूक आयोगाने ही पोटनिवडणूक जाहीर केली आहे. मात्र ही पोटनिवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणूक जाहीर होताच काँग्रेसने निवडणूक लढण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. परपरांगत हा मतदारसंघ काँग्रेसच लढवत आला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी असून ही जागा काँग्रेस लढवणार आहे.
मात्र याच जागेवर मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली पाटील लढणार असे जाहीर केले होते. मात्र काँग्रेस ही जागा सोडण्याची सुतराम शक्यता नाहीये. त्यामुळे कसबा पोटनिवडणुकीत भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. निवडणूकीसाठी काँग्रेस अॅक्शन मोडमध्ये आले असून उमेदवार कोण असणार हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.