कसब्यात मविआच्या रविंद्र धंगेकर यांचा प्रचार केल्यामुळं मनसेनं सात पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी केली होती. त्यानंतर आता पक्षात मोठी फूट पडली आहे. (kasba By poll election Raj Thackeray MNS 50 workers resign after expulsion of 7 party )
पुण्यात पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. मात्र, ऐन निवडणुकीच्या काळात मनसेच्या ५० पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सध्या सुरू आहे.
Maharashtra Politics : ठाकरे-फडणवीस राजकीय संघर्ष संपणार? नेत्यांच्या विधानांमुळे चर्चेला उधाण
भाजपचे हेमंत रासने आणि महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांच्यातच मुख्य लढत होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी न देता भाजपला पाठिंबा दिला आहे. मात्र, मनसेचे कसबा विधानसभा मतदारसंघातील सात कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार केल्याची माहिती समोर आली.
रवींद्र खेडेकर, सागर पांगारे, गोपी घोरपडे, अनिल चांदांगे, रिझवान बागवान, प्रकाश ढमढेरे, नीलेश निकम अशी या सात जणांची नावं असून त्यांची पक्षातून हाकलपट्टी करण्यात आली आहे. त्यानंतर कसबा विधानसभा मतदारसंघातील चाळीस ते पन्नास जणांनी राजीनामे दिले. राजीनामा पक्षाच्या शहराध्यक्षांकडे पाठविण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.