KDCC Bank Elections Result : कोल्हापूर बँक निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात

रमण मळा परिसरात कार्यकर्त्याची गर्दी;संचालक पदाच्या २१ जागांसाठी ही निवडणूक होत आहे.
KDCC Bank Elections Result 2022
KDCC Bank Elections Result 2022Eskal
Updated on

कोल्हापूर: जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या (KDCC Bank Elections Result 2022) मतमोजणीला आज (ता. ७) रमण मळा (Raman Mala)येथील महसूल कल्याण निधीच्या सभागृहात सुरुवात झाली आहे. या मतमोजणीत काही गटांत धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे. पहिला निकाल दहाच्या सुमारास बाहेर येण्याची शक्यता आहे. सत्ताधारी विरुध्द शिवसेना यांच्यात लढत असून, निकालाबाबत जिल्ह्यात प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे. दोन मंत्री, दोन्ही खासदार व अनेक आमदारांच्या प्रतिष्ठेची ही निवडणूक ठरली आहे. (KDCC Bank Elections Result 2022)

Summary

संचालक पदाच्या २१ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. यापैकी सहा जागा बिनविरोध झाल्याने उर्वरित १५ जागांसाठी ३३ उमेदवार रिंगणात आहेत.

दरम्यान, प्रक्रिया संस्था व पतसंस्था गटात मोठी चुरस असल्याने या गटातील निकालाबाबत राजकीय क्षेत्रात मोठी उत्सुकता आहे. प्रक्रिया संस्था गटातून खासदार प्रा. संजय मंडलिक (Sanjay Mandlik) व बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर (Babasaheb Patil-Asurlekar) हे विद्यमान संचालक विरोधी पॅनेलमधून रिंगणात आहेत; तर त्यांच्या विरोधात सत्तारूढ गटातून मदन कारंडे व प्रदीप पाटील-भुयेकर हे नशीब आजमावत आहेत. पतसंस्था गटात तिरंगी लढत असून, सत्तारूढ गटाने उमेदवारी नाकारल्याने अपक्ष रिंगणात उतरलेल्या संचालक अनिल पाटील यांच्या उमेदवारीने चुरस निर्माण झाली आहे. या गटात विरोधी आघाडीकडून प्रा. अर्जुन आबिटकर व सत्तारूढ गटातून आमदार प्रकाश आवाडे (Prakash Awade)रिंगणात आहेत.

संचालक पदाच्या २१ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. यापैकी सहा जागा बिनविरोध झाल्याने उर्वरित १५ जागांसाठी ३३ उमेदवार रिंगणात आहेत. बुधवारी (ता. ५) या निवडणुकीसाठी चुरशीने ९८ टक्के मतदान झाले. बँकेच्या सात हजार ६५१ मतदारांपैकी सात हजार ४९८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. जिल्ह्यातील १२ तालुक्यांतील ४० केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडली.

शिरोळ, आजरा, शाहूवाडीत चुरस (Shirol, Ajra, Shahuwadi)

विकास संस्था गटातील सहा जागांसाठी मतदान झाले आहे. यापैकी पन्हाळा व गडहिंग्लज तालुक्यात निकालाची औपचारिकता बाकी आहे. उर्वरित आजरा, शिरोळ, भुदरगड व शाहूवाडीत मोठी चुरस असून, या चारही तालुक्यांत चार-पाच मतांवर विजयाचे गणित अवलंबून आहे. शेवटच्या टप्‍प्यात ‘जोडणी’त कोण यशस्वी झाला, यावर या चार तालुक्यांतील विजय कोणाचा, हे अवलंबून आहे.

मतमोजणी कशी होणार?

प्रत्येक केंद्राची स्वतंत्र टेबलवर मतमोजणी होणार असल्याने तालुक्यात कोणाला किती मते मिळाली, याची माहिती मिळणार आहे. या मोजणी प्रक्रियेला विरोधी पॅनेलने विरोध करून इतर गटातील सर्व तालुक्यांतील मते एकत्रित करून त्याची मोजणी करण्याची मागणी केली. याबाबत प्राधिकरणाकडून मार्गदर्शन मागविले आहे. त्यामुळे राखीव गटातील मतमोजणी एकत्रित करून होणार की तालुकानिहाय होणार, याचा निर्णय मतमोजणी सुरू होण्यापूर्वी घेतला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.