मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) पत्राचाळ घोटाळाप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना ताब्यात घेतले आहे. त्यांना रात्री उशिरापर्यंत अटक होण्याची शक्यता आहे. साडेनऊ तास त्यांची घरी चौकशी केल्यानंतर ईडीने त्यांना ताब्यात घेतले आहे. ईडीला न घाबरल्याने ‘बाळासाहेबही म्हणाले असतील... शाब्बास संजय!’ अशी फेसबुक पोस्ट केदार दिघे (-nad86) यांनी केली आहे. त्यांनी एकप्रकारे संजय राऊत यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.
‘ना डर, ना सत्तेचा लोभ, ना मला वाचवाची भीक मागितली... तो योद्धा निडर पणे चालला शिवसेनेचा आणि महाराष्ट्राचा मराठीबाणा जोपासण्यासाठी...! दिल्ली समोर झुकणार नाही! जे घाबरून पळाले ते शिवसैनिक (Shiv sena) असू शकत नाहीत?’ अशी फेसबुक पोस्ट केदार दिघे यांनी केली आहे.
शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे (Kedar Dighe) यांची रविवारी (ता. ३१) ठाणे जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. एकप्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचण्याचा प्रयत्न यातून केला आहे. यानंतर केदार दिघे ॲक्टीव्ह झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून संजय राऊत (Sanjay Raut) यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाणे जिल्ह्यातील (Thane District) शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. केदार दिघे (Kedar Dighe) यांची ठाणे जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच आनंद दिघे यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली. यानंतर केदार दिघे उघडपणे बोलत असल्याचे यानिमित्त पाहायला मिळाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.