बाळासाहेबांच्या नावाखाली आणखी किती काळ दिशाभूल ? भाजपची उद्धव ठाकरेंवर टीका

भाजपची उद्धव ठाकरेंवर टीका
Uddhav Thackeray And BJP
Uddhav Thackeray And BJPesakal
Updated on

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे नेते एकही दिवस शिवसेनेवर टीका करण्याचे सोडत नाही. सध्या आमचे हिंदुत्व खरे की तुमचे खोटे यावरुन राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. येत्या शनिवारी (ता.१४) शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान पार पडत आहे. या प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसैनिकांना संबोधित करणार आहेत. या अभियानासाठी शिवसेनेतर्फे एक पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. या पोस्टरवर हृदयात राम आणि हाताला काम देणार आमचं हिंदुत्व ! यावर भाजपचे नेते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी ट्विट करुन टीका केली आहे. (Keshav Upadhye Criticize CM Uddhav Thackeray Over Hindutva Politics)

Uddhav Thackeray And BJP
आनंद महिंद्रांनी पाळला शब्द,'मदर्स डे'ला 'इडली अम्मा'ला दिले नवीन घर

उपाध्ये म्हणाले, हृदयात राम आणि हाताला काम देणारं आमचं हिंदुत्व असा हुंकार देणाऱ्या शिवसेनेने (Shiv Sena) आधी उन्हात राणा दाम्पत्यांसाठी घराबाहेर बसलेल्या आजीबाईंच्या नातवाला तरी नोकरी द्यावी. एसटी कर्मचाऱ्यांनी ५ महिने संप पुकारला. अनेक कर्मचाऱ्यांचे डोळ्यादेखत आयुष्य संपवलं. त्यांच्या हाताचं काम लुबाडून घेणाऱ्यांनी रामाचं नाव घेणंही पाप ठरेल, अशी टीका त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह शिवसेनेवर केली.

Uddhav Thackeray And BJP
उद्धव ठाकरेंच्या सभेच्या दिवशीच राणा दाम्पत्याची महाआरती, दिल्लीतून घोषणा

बॅनरवर हिंदुत्व शब्द लिहिला, परंतु चेहऱ्यावर असलेला पुरोगामी बुरखा उतरवला. हृदयात सत्ता आणि डोक्यात सत्तेची हवा असणाऱ्या मुख्यमंत्रीपदासाठी भ्रष्टवाद्यांशी हातमिळवणी करुन हिंदुत्व कधीच सोडलं. आता केवळ उरला आहे तो केवळ दिखावापणा. बाळासाहेबांच्या नावाखाली आणखी किती काळ दिशाभूल करणार आहात, असा सवाल केशव उपाध्ये यांनी ठाकरे यांच्यावर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.