'शिवसेनेला हिंदुत्वाची जाहिरात करावी लागते, पाहून कीव येते'

'ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या सेनेला हिंदुत्वाची जाहिरात करावी लागते'
politics
politicsgoogle
Updated on
Summary

'ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या सेनेला हिंदुत्वाची जाहिरात करावी लागते'

मागील काही दिवसांपासून भोंगा आणि हनुमान चालीसावरून राज्याचं राजकारण तापलं आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजप यांच्यातील संघर्ष वादाला गेल्याचे चित्र आहे. दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. दरम्यान, आता भाजापचे केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. शिवसेनेची १४ मे ला मुंबईत जाहीर सभा होणार आहे यावरून त्यांनी उपाध्ये यांनी टोला लगावला आहे.

politics
लिंबू महागताच केला घोटाळा, 'आप' सरकारने तुरुंग अधीक्षकाला केले निलंबित

यासंदर्भात उपाध्ये यांनी ट्विट केलं आहे. यात ते म्हणतात, शिवसेनेचे पक्षप्रमुख १४ मे रोजी मुंबईत मोठी सभा घेणार आहेत. त्यासाठी शिवसेनेकडून जोरदार जाहिरातबाजी सुरू करण्यात आली. एकेकाळी ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेला आज हिंदुत्वाची जाहिरात करावी लागतेय, हे पाहून कीव आली. खऱ्या हिंदुत्वाचा हुंकार ऐकण्यासाठी यायलाय पाहिजे असं आमंत्रणही सेनेनं दिलं आहे. पण तुच्याकडे खरं हिंदुत्व राहिलंय कुठं?, असा खोचक सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे. ते शिवसेनाप्रमुखांच्या काळात होतं. पण तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नादी लागून ते हिंदुत्व कधीच सोडलंय, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

ते पुढे म्हणाले, मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनाप्रमुख आणि हिंदुत्वाच्या विचारांशी प्रतारणा करून त्या हिंदुत्वावरील हक्क तुम्ही गमावून बसला आहात. आता केवळ सत्ता राखण्यापुरती अगतिकता उरली आहे. गेल्या अडीच वर्षांत पालघरमध्ये साधूंची झालेली हत्या, रझा अकादमीच्य गुंडांनी केलेला हिंसाचार आणि आता गाजत असलेल्या भोंग्यांच्या विषयात वारंवार दिसत आहे. त्यामुळे आता तुम्ही कसला हिंदुत्वाचा हुंकार ऐकवणार, आता असेल ते केवळ शरद पवार आणि सोनिया गांधी यांनी सेन्सॉर करून दिलेलं भाषण असणार आहे. त्यातून तुम्ही कसला हिंदुत्त्ववादी विचार मांडणार? आणि तो कोण ऐकणार?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

politics
दाऊदच्या जवळच्या २० व्यक्तींवर मुंबईत छापे; NIA चं सर्च ऑपरेशन

दरम्यान, शिवसेनेतर्फे सुरू करण्यात आलेल्या शिवसंपर्क अभियाना अंतर्गत येत्या १४ मे रोजी वांद्रे-कुर्ला संकुलात (बीकेसी) विराट सभेचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री ठाकरे हे या विराट सभेला संबोधित करणार असून, या सभेचा 'टिझर' रविवारी शिवसेनेतर्फे जाहीर करण्यात आला. हिंदुत्त्वाचा मुद्दाच या सभेचे प्रमुख आकर्षण असणार आहे. दरम्यान, आगामी मुंबईसह इतर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सभेच्या माध्यमातून शिवसेना जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.